Loudspeaker Controversy News in Pune | DJ Banned in Pune for Eid Dainik Gomantak
गोवा

Goa Pollution Control Board: ध्वनी प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी वास्तविक वेळ निरीक्षण प्रणाली

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय : 24 तास जागता पहारा

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Pollution Control Board: राज्यात ध्वनी प्रदूषणाला मर्यादा घालूनही नियमांचे उघडपणे उल्लंघन होत आहे. विशेषतः किनारपट्टी भागांमध्ये रात्री न थांबणाऱ्या पार्ट्‍या होत असल्याने परिस्‍थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी 12 ठिकाणी ऑनलाईन वास्तविक वेळ निरीक्षण प्रणाली सुरू करण्याचा निर्णय हल्लीच झालेल्या बैठकीत घेतला आहे.

या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयांशी जोडलेल्या प्रणालीसह वास्तविक वेळ निरीक्षण प्रणालीचा वापर करून ऑनलाईन ध्वनी पातळी देखरेख सुविधेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. ही प्रणाली 24 तास, वर्षातील 365 दिवस आवाजाच्या पातळीचे निरीक्षण करेल.

या प्रणालीसाठी मंडळाने व्यावसायिक क्षेत्र, शांत क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र ओळखण्यासाठी ध्वनी पातळी मोजणारे यंत्र बसवले आहे. एकूण १२ ठिकाणी ही यंत्रे बसवली जाणार असून त्यात उत्तर गोव्यातील किनारपट्टीला विशेष प्राधान्य दिले जाईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कळविले आहे.

पोलिसांना सतर्क करणार यंत्रणा

ही प्रणाली कशी काम करणार, याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी म्हणाले की, ही ऑनलाईन माहिती मंडळाच्या कार्यालयात तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित पोलिस ठाण्यात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाईल. त्यामुळे त्यांना त्वरित कारवाई करण्यास मदत होईल. त्यामुळे पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी कारवाईसाठी एक पाऊल पुढे असणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT