Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak

Mahadayi Water Dispute: शिक्षण खात्‍याने घेतली म्‍हादईच्‍या मुद्याची धास्‍ती

शिक्षक, विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांपासून दूर राहण्याचे निर्देश

Mahadayi Water Dispute: म्‍हादईप्रश्‍‍नी राज्‍यातील नागरिकांत सरकारप्रति रोष असतानाच या विषयाची शिक्षण खात्‍यानेही धास्‍ती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्‍यातील अनेक शिक्षकांना ‘एडीआय’ (साहाय्यक शिक्षणाधिकारी) यांच्‍यामार्फत ‘म्‍हादई संदर्भात कोणत्‍याही उपक्रमात सहभागी होऊ नये. तसेच विद्यार्थ्यांचाही सहभाग असू नये’, असे दिशानिर्देश देण्‍यात आले आहेत.

Mahadayi Water Dispute
Crime News: गोव्याच्या राज्यपालांचे घर फोडणाऱ्या 'रॉबिनहूड'ला पुण्यात अटक

त्‍यामुळे म्‍हादईसाठी जागर करण्‍याची कृती असंविधानिक वा नियमबाह्य ठरते काय, अशी चर्चा सध्‍या शिक्षकांमध्‍ये सुरू आहे. साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून म्‍हादईचे पाणी वळवण्‍यासाठी कर्नाटक सर्वतोपरी प्रयत्‍न करत आहे. त्‍यांना केंद्राची साथ लाभत आहे आणि गोवा सरकार सपशेल अपयशी ठरत आहे.

वस्‍तुस्‍थितीचे अवलोकन राज्‍याला झाले असून, सामाजिक पातळीवरील विविध घटक आपल्‍या परीने म्‍हादई बचावार्थ जागृती करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्‍याने व्‍हॉटसॲपद्वारे शिक्षकांसाठी खास मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्‍यात अध्‍ययन व सेवेसंदर्भात आठ मुद्दे आहेत.

परंतु त्‍यातील म्‍हादई विषयक एक सूचना खटकण्‍याजोगी आहे. विशेष म्‍हणजे कोणी आक्षेप नोंदवू नये म्‍हणून परिपत्रक काढण्‍याऐवजी व्‍हॉटसॲपचा वापर करण्‍यात आला आहे. जेणेकरून शिक्षकांवर तो सूचक दबाव ठरेल.

नेमके काय म्‍हटलेय?

म्‍हादई संदर्भात कोणत्‍याही कार्यक्रम, बैठकांना शिक्षकांनी उपस्‍थित राहू नये. तसेच विद्यार्थी/विद्यार्थिनींना अशा प्रकारच्‍या स्‍पर्धा, उपक्रमांमध्‍ये सहभागासाठी घेऊन जाऊ नये, असा उल्‍लेख व्‍हॉट्‌सॲपवरील निर्देशांत आहे.

Mahadayi Water Dispute
Dona Paula Jetty: दोना पावला जेटीवर प्रत्येकाची ओळख पटविणे शक्य आहे का? - बाबूश मोन्सेरात

चिमुरडीचा ‘तो’ व्‍हिडिओ चर्चेत

गत महिन्‍यात साखळीतील विद्यार्थिनीने ‘म्‍हादई’वर कोकणी स्‍वगतामधून भाष्‍य केले होते. चिमुरडीचा हा व्‍हिडिओ व्‍हायरल झाला होता. त्‍याचा तर हा परिणाम नाही ना, अशीही चर्चा आहे.

शिक्षक संभ्रमात

म्‍हादई संदर्भात जागृती केली तर ते सरकारविरोधी ठरते का? म्‍हादई रक्षणार्थ घेतलेली भूमिका नियमबाह्य ठरते का? जारी केलेले सूचनापत्र सरकारी शाळांनाच आहे की अनुदानित हायस्‍कूलनाही लागू पडते, असा संभ्रम शिक्षकांत असून, तशी चर्चा सुरू आहे.

"म्‍हादई विषयक सरकार विरोधी कोणत्‍याही धोरणाला सहकार्य करू, असे शिक्षण खात्‍याने सूचनापत्र जारी केले आहे. तसे परिपत्रक काढलेले नाही."

- शैलेश झिंगडे, शिक्षक संचालक

म्‍हादई प्रकरणी राज्‍य सरकारने सर्व बाबींमध्‍ये पारदर्शकता ठेवायला हवी. सरकार काही लपवू पाहात आहे, हे शिक्षण खात्‍याने जारी केलेल्‍या निर्देशांतून स्‍पष्‍ट होत आहे.

-गिरीश चोडणकर, काँग्रेस नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com