Viresh Borkar accusation Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ''पाटकरांनी जबाबदारी घेतली नाही'',वीरेश बोरकर यांचा आरोप; काँग्रेसच्या 'उद्या'मुळे युतीचा खेळ खल्लास

Goa ZP Elections: युती संपुष्टात येण्यामागे काँग्रेस पक्षाने 'निर्णय घेण्यास विलंब' हे मुख्य कारण असल्याचे रिव्होल्युशनरी गोवन्सचे म्हणणे

Akshata Chhatre

Goa political alliance: रिव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार विरेश बोरकर यांनी थेट पाटकर यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे करत, युती तुटल्याची जबाबदारी काँग्रेसवर ढकलली आहे.गोवा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस (INC) आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (RGP) यांच्यातील युती संपुष्टात येण्यामागे काँग्रेस पक्षाने 'निर्णय घेण्यास विलंब' हे मुख्य कारण असल्याचे रिव्होल्युशनरी गोवन्सचे म्हणणे आहे.

'उद्या कधी आलाच नाही': बोरकर यांचा संताप

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे सतत युतीचा निर्णय घेण्यासाठी 'केंद्रीय नेतृत्वाचे आगमन' होण्याची वाट पाहत असल्याचे सांगत होते. यावर बोलताना रिव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार विरेश बोरकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

बोरकर म्हणाले, "काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर नेहमी सांगायचे की, त्यांचे केंद्रीय नेते येणार आणि त्यानंतरच ते युतीवर निर्णय घेतील. अनेक दिवस ते निर्णय 'उद्या' येईल, असे सांगत राहिले, पण तो 'उद्या' कधी आलाच नाही."

'प्रदेशाध्यक्षांनी जबाबदारी घेतली नाही'

विरेश बोरकर यांनी स्पष्ट केले की, युतीसाठी रिव्होल्युशनरी गोवन्सने खूप प्रयत्न केले, इतकेच नाही तर काँग्रेसमधील काही नेत्यांनीही युती व्हावी यासाठी प्रयत्न केले. मात्र, पक्षप्रमुख म्हणून पाटकर यांनी जबाबदारी घेतली नाही, असे त्यांना वाटते.

बोरकर म्हणाले, "पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पाटकर यांनी जबाबदारी घ्यायला हवी होती, पण मला नाही वाटत त्यांनी ती घेतली." काँग्रेसच्या या भूमिकेमुळे युतीचा निर्णय लांबत गेला आणि अखेरीस तो अपयशी ठरला.

वेळेअभावी 'स्वतंत्र' लढण्याचा निर्णय

युतीच्या चर्चेत काँग्रेसने रिव्होल्युशनरी गोवन्सला विश्वासात न घेताच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे रिव्होल्युशनरी गोवन्सनेही आपला मार्ग मोकळा करत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.

बोरकर यांनी यावर जोर देत सांगितले, "त्यांनी (काँग्रेसने) आमच्याशी चर्चा न करता त्यांची यादी जाहीर केली. त्यामुळे आम्हीही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे आणि आम्ही पुढे वाटचाल करत आहोत, कारण आता वेळ शिल्लक नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

Lonavala Accident: लोणावळ्यात भीषण अपघात..! अनियंत्रित कारची ट्रकला धडक, गोव्यातल्या दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू

मुरगावच्या SGPDA मच्छी मार्केटमध्ये प्रचंड अस्वच्छता! डासांची पैदास वाढल्याने स्थानिकांचा संताप

IND vs SA: 'शतकवीर' क्विंटन डी कॉक! टीम इंडियाविरुद्ध 'असा' विक्रम करणारा पहिला आफ्रिकन खेळाडू

Aquem Fire: आके येथील फास्ट फूड सेंटरला मध्यरात्री भीषण आग; 25 लाखांचे नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT