Goa Politics : MGP & BJP Dainik Gomantak
गोवा

BJP आणि MGP च्या युतीबाबत चर्चांना उधाण

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (एमजीपी) युतीसाठी घाईघाईने करार करण्याची इच्छा नसल्याचे संकेत दिले आहेत

दैनिक गोमन्तक

पणजी: अगमी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या गोव्याचं राजकारण (Goa Politics) हा चर्चेचा विषय ठरत आहे, गेल्या काही दिवसांत अनेकांनी पक्ष सोडले, आता राज्यात युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक पक्षाच्या जेष्ट नेत्यांची रेलचेल चालू आहे. त्यातच काल राज्यात भाजपच्या (BJP) कार्यकारिणी बैठकीला सुरवात झाली, दरम्यान भाजप आणि एमजीपीच्या (MGP) युतीची चर्चा चालू असतानाच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (एमजीपी) युतीसाठी घाईघाईने करार करण्याची इच्छा नसल्याचे संकेत दिले आहेत, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) या प्रादेशिक पक्षाला निवडणूकपूर्व लढतीसाठी युती करण्याचे आवाहन करताना दिसत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिलेल्या माहिती नुसार, पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची एमजीपीसोबत युतीसंदर्भात चर्चा सुरू आहे. दरम्यान तानावडे म्हणाले की, फडणवीस यांनी यापूर्वीच एमजीपी नेते रामकृष्ण ढवळीकर यांच्याशी या विषयावर बैठक घेतली असून चर्चा सुरू आहे. "मी कोणतीही चर्चा करत नसून, आमचे निवडणूक प्रभारी एमजीपीशी युतीबाबत चर्चा करत आहेत" तसेच काही बैठकाही झाल्या पार पडल्याची माहिती त्यांनी दिली

ढवळीकर यांनी ऑक्टोबरमध्ये फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. मात्र, या भेटीत युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे ढवळीकर यांनी सांगितले होते.

यापूर्वी एमजीपीने 2012 ची निवडणूक भाजपसोबत युती करून लढवली होती, तर 2017 मध्ये; दिवंगत मनोहर पर्रीकर यांना सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला होता.

एमजीपीने भाजपसोबत युती करण्यास वारंवार नकार दिला आहे, सूत्रांचे म्हणणे आहे की पक्षाने 12 जागांची मागणी केली आहे, तर भाजप फक्त चार-पाच जागा वाटून घेण्यास इच्छुक आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला गोव्यात असलेल्या फडणवीस यांनी संभाव्य युतीबाबत पक्षाच्या आमदारांकडून अभिप्राय मागविण्यासाठी अनेक बैठका घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT