Sudhin Dhavlikar Criticised viriato fernandes Dainik Gomntak
गोवा

Goa Politics: 'कोण कमिन घेतंय आधी जाहीर करा...', सुदिन ढवळीकरांचं विरियातो फर्नांडिसांनं खुलं आव्हान

Manish Jadhav

कोणता आमदार किंवा कोणता मंत्री कंत्राटदारांकडून कमिशन घेतो ते सप्रमाण जाहीर करा, असे आव्हान मडकईचे आमदार तथा माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व विद्यमान वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांना दिले आहे. रस्ते खराब होण्यास आमदार, मंत्रीच जबाबदार असून कंत्राटदारांकडून कमिशन घेत असल्याने रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केला होता. त्यासंबंधी पत्रकारांशी बोलताना सुदिन ढवळीकर यांनी खासदारांनी आधी नावे स्पष्ट करायला हवीत असा आग्रह धरला.

सरकारकडून लोकांना जे चांगले ते देण्याचा सातत्याने प्रयत्न होत राहिला आहे. बऱ्याचदा आमदार, मंत्र्यांना कागदोपत्री सोपस्कार पूर्ण व्हायच्या आधी संबंधित कंत्राटदारांना पैसे द्यावे लागतात, स्वतः पदरमोड करावी लागते, नंतर पैसे परत केले जातात, पण आधी पैसे खर्च करुन रस्ता तसेच इतर कामे करावी लागतात.

कारण लोकांना चांगले ते देण्याचा हा हव्यास आहे. विरियातो फर्नांडिस हे राजकारणात नवीन आहेत, त्यांना सरकारी कामाचा अनुभव नाही. त्यामुळे ते बालिश विधाने करीत सुटले आहेत. अशा विधानांमुळे लोकांत संभ्रम निर्माण होत असून ही बालिश विधाने करण्याचे विरियातो फर्नांडिस यांनी थांबवावे आणि सप्रमाण पुढे यावे, असे आव्हानच सुदिन ढवळीकर यांनी दिले.

दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहेच, मीही त्याला दुजोरा दिला आहे, शिवाय अशा कामात हयगय करणाऱ्या संबंधित अभियंत्यांवरही कारवाई करायला हवी, असा आपला आग्रह असल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले.

हरियाणात काँग्रेसने काय केले?

गोव्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून फुटून गेलेल्या एकाही दलबदलूला तिकीट देणार नाही, असे जाहीर केले आहे, पण काँग्रेस पक्षाने हरियाणात काय केले त्याचा अभ्यास करावा, असे सुदिन ढवळीकर म्हणाले. हरियाणात काँग्रेसमधून फुटून इतर पक्षात गेलेल्यांना पुन्हा सन्मानाने बोलावून निवडणुकीचे पक्षातर्फे तिकीट दिले आहे. त्यामुळे बोलायचे एक आणि करायचे भलतेच असे या पक्षाचे झाल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले. हे फक्त आपणच बोलू शकतो, कारण एकाच पक्षात स्थिर राहून राजकारण करणारा आपण एकमेव आमदार असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

हवेत गोळीबार करु नये

राज्यात लष्करी राजवट आणण्याच्या विधानासंबंधी बोलताना सुदिन ढवळीकर यांनी लष्करी सेवेत काम केलेल्या विरियातो फर्नांडिस यांना या क्षेत्राची पूर्ण माहिती नाही असे नमूद केले. कोणत्याही गोष्टीची शहानिशा करण्यापूर्वी हवेत गोळीबार करु नये असा, असे सांगताना विरियातो फर्नांडिस यांनी जबाबदारीने विधान करावे, असाही सल्ला दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT