Goa Politics जयेश साळगावकर
Goa Politics जयेश साळगावकर Dainik Gomantak
गोवा

"सध्या तरी मी गोवा फॉरवर्ड पक्षाचाच"

दैनिक गोमन्तक

कळंगुट : (Goa Politics) येत्या विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly) पाश्वभुमीवर अनेक राजकीय पक्षांचे नेते आपणाशी संपर्क साधत आहे. मात्र सध्यातरी मी गोवा फॉरवर्डचाच (Goa Forword) आहे, असे स्पष्ट मत साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांनी सांगितले.

साळगाव येथील प्रसिद्ध माय- दे- देऊश चर्च परिसराचे सुशोभिकरण तसेच समोरच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. येत्या 26 नोव्हेंबरला फेस्ताच्या आधीच ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन जयेश सांळगांवकर यांनी दिले. यावेळी साळगाव पंचायतीच्या सरपंच लाफीरा गोम्स, पंच सदस्य कल्पना मोरजकर, माजी सरपंच एकनाथ तोरस्कर, लुकास रेमेडियस, तसेच चर्चचे धर्मगुरू फा. जॉन आदी मान्यवर उपस्थित होते.

लवकरच करणार डांबरीकरणाचे काम

कोविड महामारी तसेच त्यानंतर आलेल्या पावसामुळे पंचक्रोशीतील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांचे सपाटीकरण तसेच डांबरीकरणाचे काम प्रलंबित होते. ते आता हाती घेण्यात आले असून लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे, असे साळगावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : जनाधार कमी झाल्‍यानेच फळदेसाईंचे आरोप; सावित्री कवळेकर यांचा दावा

Siolim Water shortage : सागर उशाला; तरी कोरड पडलीय घशाला! आसगाव, शापोरावासीयांची व्यथा

Panaji News : पाटकर यांनी माफी मागावी; आमोणकरांची मागणी

Bicholim Factory Explosion : डिचोलीतील दुर्घटना; कारखान्यात सलग चार स्फोट

Video: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने पुन्हा ओकली गरळ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT