Goa Politics : तृणमूल कॉंग्रेस आणि मगो पक्षाची नक्की युती Dainik Gomantak
गोवा

मगोप-तृणमूल युती मागचं रहस्य काय ..

युतीचा फायदा निधी मिळवण्यापलीकडे काही होऊ शकतो?

दैनिक गोमन्तक

फोंडा : तृणमूलच्या गोव्यातील (Goa Politics) राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जात असतानाच सोमवारी या पक्षाची मगोपशी (MGP) युती झाल्याचे जाहीर झाले असून त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना होऊ शकतो का, हा प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडला आहे.

तृणमूल काँग्रेस (TMC) सध्या गोव्यात भरारी घेताना दिसत आहे. तृणमूलचे ‘नवी सकाळ’चे फलक राज्यात जागो जागी दिसताहेत. प्रख्यात रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या ‘आयपॅक’चे कार्यकर्ते सध्या गोव्यात घरोघर फिरताना दिसतात.

गोव्यातील अनेक साहित्यिक, कलाकार या पक्षाच्या गळाला लागलेले आहेत. काहींनी तर आपली सरकारी नोकरी (Government Job) सोडून तृणमूलच्या कळपात शिरकाव केला आहे. हे कमी म्हणून की काय आता पश्चिम बंगालचे लोक गोव्यात दाखल व्हायला लागले आहेत. काहींनी तर आम्ही गोव्यात मतदान करणार असल्याचे जाहीरही करून टाकले आहे.

मगोप हा स्थानिक पक्ष असल्यामुळे मगोप आर्थिकदृष्ट्या राष्ट्रीय पक्षाशी स्पर्धा करू शकत नाही. आता बारा जागा लढवायच्या म्हटल्या तरी त्याला निधी हा लागतोच. आजचे राजकारण म्हणजे मोठा व्यवहारच झाला आहे. कार्यकर्तेसुध्दा ‘पैशाचीच भाषा’ बोलताना दिसतात. मातीतला पक्ष, भाऊंचा पक्ष यासारखे शब्द भाषण करताना वापरताना ठीक आहे, पण प्रचाराला बाहेर पडला की प्रथम लागतो तो पैसा. ढवळीकर बंधूंना याची जाणीव होऊ लागल्याचे दिसत आहे.

मगोपचे बरेच संभाव्य उमेदवार सध्या पक्षाकडे निधीची मागणी करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या बलवान पक्षाशी युती करणे हे मगोपला सध्या आवश्यक वाटायला लागले आहे. सध्या तृणमूल राज्यात पैशाचा पाऊस पाडत आहे. (किमान तसे दिसले तरी) हे पाहिल्यास अनेकांना तृणमूलचे वेध लागायला लागले आहेत. यामुळेच मगोपक्षानेही या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याचे ठरविल्याचे एकंदरीत परिस्थिती पाहता दिसून येत आहे.

याआधीचे युतीचे काय झाले?

गेल्यावेळी मगोपने भारतीय भाषा सुरक्षा मंच व शिवसेनेशी युती केली होती, पण ती त्यांच्या अंगलट आली होती. तसे आता नाही झाले म्हणजे मिळवले. मगोपने ज्या जागा लढविण्याच्या विचार केला आहे त्यातली मडकई ही जागा सोडल्यास इतर ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून येतील याची शाश्वती नाही. तृणमूलशी संग केल्यास मगोपचा आर्थिक प्रवाह वाढू शकतो, पण त्याचा फायदा पक्षाला होतो की नाही हेही पाहावे लागेल. भाजपाची ताकद नजेरआड करता येणार नाही. सध्या मतप्रवाह भाजपच्या विरोधात असला तरी त्यांच्याकडे विविध हातखंडे आहेत हे नाकारता येणे शक्यच नाही. त्यातला एक हमखास यशस्वी होणारा हातखंडा म्हणजे दुसऱ्या पक्षातील आमदारांना आपल्या पक्षात आणणे. यामुळेच ते तेराचे सत्तावीस होऊ शकले. मगोपला तर तो शापच आहे. त्यात परत मगोप व तृणमूल कितीही एकत्र आले तरी ही युती सत्तेवर येईल असे बिलकुल वाटत नाही.

लवूंच्या गर्जनेचे काय

मगोपतून हकालपट्टी केल्यामुळे लवूंनी तृणमूलचा झेंडा हाती घेतला होता, पण आता युती झाल्यास हा झेंडा खाली ठेवून त्या जागी परत त्यांना मगोपचा झेंडा हाती घ्यावा लागेल असेच वाटते. आपण मडकईमध्ये मगोपच्या सुदिन ढवळीकरांच्या विरोधात लढणार अशी गर्जना लवूंनी काही दिवसांपूर्वी केली होती, पण आता ही गर्जना हवेत विरणार की काय असेच वाटायला लागले आहे.

‘हेचि फळ काय मम तपाला’

जयदीप शिरोडकरांनी मोठ्या अपेक्षेने तृणमूलचा हात धरला होता, पण तृणमूलनेच हा हात झिडकारल्यामुळे आता जायचे तरी कोठे असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला असेल. प्रियोळचे लोककलाकार कांता गावडे यांनी तर कोकणी अकादमीच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी प्रियोळातून आपल्या प्रचारालाही सुरवात केली होती, पण आता हा सर्व इतिहास व्हायला लागला आहे. ‘हेचि फळ काय मम तपाला’ असे म्हणण्या ची वेळ या सर्व लोकांवर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT