Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: मंत्री तवडकर शिक्षण खात्यासाठी उत्सुक; आज खातेवाटप शक्‍य, उत्कंठा शिगेला

Goa Cabinet Reshuffle: माजी सभापती रमेश तवडकर व माजी मुख्‍यमंत्री दिगंबर कामत यांना कोणती खाती मिळतील, याची साऱ्यांनाच उत्‍सुकता आहे.

Sameer Amunekar

पणजी : माजी सभापती रमेश तवडकर व माजी मुख्‍यमंत्री दिगंबर कामत यांना कोणती खाती मिळतील, याची साऱ्यांनाच उत्‍सुकता आहे. रमेश तवडकर यांनी ‘आपल्‍याला शिक्षण खात्‍यात रस आहे, परंतु निर्णय मुख्‍यमंत्र्यांवर अवलंबून आहे’, असे वक्‍तव्‍य काणकोणात केले. आज खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे.

तवडकर यांनी खात्‍यांसंदर्भात स्‍पष्‍ट मते व्‍यक्‍त केली आहेत. ते पत्रकारांशी बोलताना म्‍हणाले, ‘मला कला व संस्कृती खात्यात रस नाही; कारण त्यात नाविन्याला संधी नाही. गावडे यांच्याकडील खाती आपल्याकडे यावी यासाठी कधीच हट्टहास धरला नाही; मात्र आदिवासी कल्याण खाते यापूर्वी आपल्याकडे होते, तेव्‍हा मी एकवीस योजना मार्गी लावल्या.

त्याचप्रमाणे एकूण अंदाज पत्रकातील बारा टक्के निधी विविध खात्यांमार्फत अनुसूचित जमातीच्या कल्याण योजनांसाठी वापरण्यात येईल, यासाठी प्रयत्‍नशील राहिलो’. दरम्‍यान, कामत व तवडकर हे अनुभवी नेते असल्‍याने त्‍यांना शिक्षण, बांधकाम अशी महत्‍वाची खाती दिली जातील, अशी अटकळ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: न्यूझीलंडमध्ये 'आफ्रिकी' पॉवर! वियान मुल्डरचा 'तो' शॉट पाहून तुम्हीही व्हाल अवाक; स्टेडियमची सीमा ओलांडून चेंडूनं गाठला रस्ता

Prabhakar Panshikar: ..खऱ्या अर्थानं नायक कसा असावा? याचे उत्तम उदाहरण 'प्रभाकर पणशीकर'

Querim Ponda: सफर गोव्याची! लावण्यमयी निसर्गराजीने नटलेलं, सुरश्री केसरबाई केरकरांचा पदस्पर्श लाभलेलं 'फोंडा-केरी'

Ponda By Election: फोंड्यात भाजपला 'गटबाजी'ची भीती! उमेदवारीचा पेच सुटेना; युती असूनही मगोचे काही कार्यकर्ते काँग्रेससोबत

Goa Opinion: ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ ऐकताना, हळूहळू नाहीसा होत चाललेला गोवा कानांना खुपत होता; राजकीय भक्ती आणि भवितव्य

SCROLL FOR NEXT