Rama Kankonkar attack Dainik Gomantak
गोवा

गुंड 'जेनिटो' भाजपसोबतच, दामूंनी जनतेकडे पुरावे मागू नये; जनाची नाही, मनाची लाज बाळगा, पोळजींनी राजकारण्यांचे काढले वाभाडे

Rama Kankonkar Assault Case: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याला सात दिवस उलटूनही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही

Akshata Chhatre

Rama Kankonkar assault case Goa: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याला सात दिवस उलटूनही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही, यावरून आता गोव्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी या प्रकरणी थेट भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

अटक केलेला संशयित भाजपचाच असल्याचा दावा

या प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यासाठी जनतेकडून पुरावे मागणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या भूमिकेवर शंकर पोळजी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी दावा केला की, पोलिसांनी ज्या संशयित जेनिटोला अटक केली, तो भाजपचाच कार्यकर्ता आहे.

पोळजी म्हणाले की, जेनिटो जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीदरम्यान एका भाजप कार्यकर्त्याच्या गळ्यात हार घालताना दिसला होता आणि तो स्वतः निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चाही काही दिवसांपूर्वी सुरू होत्या.

त्यामुळे दामू नाईक यांनी विनाकारण काही तरी बोलू नये किंवा जनतेकडे पुरावे मागू नयेत. या घटनेबाबतचे सर्व पुरावे सोशल मीडियावर आधीच उपलब्ध असून, मुख्य आरोपी कोण आहे हे लोकांना माहीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘पोलिसांना त्यांचे काम करू द्या’

पोळजी यांनी भाजप नेत्यांकडून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, “अटक केलेला माणूस भाजपच्या जवळचा आहे, त्यांच्यातलाच कुणी राजकारणी आहे, त्यामुळे कुणाचाही बचाव करण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांवर जबरदस्ती न करता त्यांना त्यांचे काम करू द्यावे.” राजकारण्यांना जनाची नाही, किमान मनाची लाज असेल, तर त्यांनी सरकारला पाठिंबा देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

‘विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरावा’

या प्रकरणी विरोधी पक्षांनीही आवाज उठवावा, अशी मागणी शंकर पोळजी यांनी केली. “विरोधकांनी हा मुद्दा असाच उचलून धरला पाहिजे, जेणेकरून गोवा गुन्ह्यांपासून मुक्त होईल. आम्ही शांत आणि सुशेगाद गोंयकार आहोत. पुरावे समोर असताना या घटनेचा निष्पक्ष तपास व्हावा,” अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT