MLA Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'नो मेन लँड'च्या मुद्यावरुन विजय सरदेसाईंचा गंभीर आरोप; 'सरकार जागा टिकवण्याऐवजी..'

MLA Vijay Sardesai Criticized Sawant Government: राज्यात सध्या 'नो मेन लँड' च्या मुद्यावरुन राजकीय वातावारण तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार घमासान पाहायला मिळत आहे.

Manish Jadhav

राज्यात सध्या 'नो मेन लँड' च्या मुद्यावरुन राजकीय वातावारण तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांनी या मुद्यावरुन सावंत सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकार जमिनी टिकवण्याऐवजी विकत असल्याचा घणाघात सरदेसाईंनी केला.

'सरकार टिकवण्याऐवजी जमीन विकतयं', सरदेसाईंचा घणाघात

'नो मेन लँड' जमिनीवर सरकार प्रकल्पाची योजना आखत आहे. मात्र, लोक त्याला कडाडून विरोध करतील. गाव आणि लोकांसाठी ते फायदेशीर नसल्याने सरकार जमीन जतन न करता ती विकत असल्याचा घणाघात सरदेसाईंनी केला.

सरकारी जमिनीवर अतिक्रमण करु नका!

तत्पूर्वी, सरकारी जमिनी दिसल्या म्हणून अतिक्रमण करु नका, तर गावाचा विचार करुन प्रकल्पांसाठी या जमिनी राखून ठेवा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याआगोदर स्पष्ट केले होते. अतिक्रमणांविरुद्ध धडक कारवाई करुन या जमिनी सरकार ताब्यात घेणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दिला होता.

"नो मेन लँड" ताब्यात घेण्यासाठी कायदा

गोव्यात "एसआयटी" स्थापन करुन जमीन गैरव्यवहाराची चौकशी आमच्याच सरकारने केली. या चौकशीत आढळून आलेल्या "नो मेन लँड" सरकार ताब्यात घेण्यासाठी कायदा करण्याचा विचार करतयं. हा कायदा तयार होताच कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Samaj Goa: अशोक नाईक गटाला दिलासा, संस्था महानिरीक्षकांचा निवाडा रद्दबातल; भंडारी समाजातील संघर्ष

Adil Shah Palace In Goa: विकासाची लाट, आदिलशाही पॅलेसची 'वाट'; सामाजिक कार्यकर्त्या सिसील रॉड्रिगीज यांची आर्त हाक!

गोव्यात सौंदर्य, पर्यावरण टिकवणाऱ्या उपक्रमांची अत्यंत आवश्यकता, स्थानिकांमुळेच राज्याच्या प्रेमात; कॅथरीना

Desmond Costa Goa Revolution: ठाम उभे राहून क्रांती करण्याची गरज... गोव्यातील तरुणांनी संघटना उभारावी

Goa News Updates: 'ज्यांची बाजू खोटी असते तेच...'; कळसा-भांडूरा प्रकल्पप्रकरणी सुभाष शिरोडकरांचा हल्लाबोल; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT