carlos ferreira Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: अमित पाटकरांच्या तक्रारीवर आमदार कार्लुस फेरेरा हसले; म्हणाले, 'ते बालिश आणि इमॅच्युर कृत्य'

Goa Congress: पाटकरांच्या पत्रामुळे काँग्रेसमधील धुसफूस समोर आली असल्याची चर्चा होत असून, कार्लुस यांनी मात्र ही तक्रार हसण्यावारी घेतली.

Pramod Yadav

पणजी: आमदार कार्लुस फेरेरा यांच्याविरोधात पक्ष शिस्तभंग अंतर्गत कारवाई करावी अशा मागणीचे पत्र प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी प्रभारी माणिकराव ठाकरे यांना लिहले आहे. या पत्राची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु असताना, कार्लुस फेरेरा यांनी मात्र हे पत्र हसण्यावारी घेतल्याचे दिसत आहे. फेरेरा यांनी हे कृत्य बालिश आणि इमॅच्युर असल्याचे म्हटले आहे.

कुडचडे येथे पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दांडी मारुन फेरेरा यांनी भाजप आमदार आणि माजी मंत्री नीलेश काब्राल यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. फेरेरा वारंवार पक्षाच्या विरोधात कृत्य करत असल्याचे पाटकरांनी म्हणत त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र पाटकरांनी प्रभारी माणिकराव ठाकरे आणि सचिव अंजली निंबाळकर यांना लिहले आहे. या पत्रामुळे काँग्रेसमधील धुसफूस समोर आली असल्याची चर्चा होत असून, कार्लुस यांनी मात्र ही तक्रार हसण्यावारी घेतली.

"मला शंका आहे की अशा तक्रारीचे पत्र खरचं प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी लिहले आहे. मी ते वाचले आणि हसलो, मला ते खूपच बालिश आणि इमॅच्युर वाटले. मला वाटत नाही आमचे प्रदेशाध्यक्ष एवढे बालिश असतील. असं काही होतं तर ते मला एक फोन करु शकले असते आणि विषय सुटला असता. शिस्तपालन समिती मला नोटीस बजावेल त्यावेळी योग्य ते उत्तर देईन. मी काहीही चुकीचे केलेले नाही," असे कार्लुस फेरेरा बाजू मांडतांना म्हणाले

कार्लुस फेरेरा पाटकरांनी लिहलेल्या पत्रावर शंका घेत असताना काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे आणि सचिव अंजली निंबाळकर यांनी मात्र तक्रार प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे. पत्रात नमूद तक्रारीची चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती दोघांनी दिली आहे. ठाकरे आणि निंबाळकर फेरेरा यांच्याशी संवाद साधतील आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT