Goa CM Pramod Sawant | Minister Govind Gaude And President Damu Naik Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: मुख्यमंत्री कारवाई होणार म्हणताच मंत्री गोविंद गावडेंना आठवली मैत्री; माध्यमांवर फोडले खापर

Goa Politics: फोंडा येथे झालेल्या प्रेरणा दिन कार्यक्रमात गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर तोंडसुख घेताना अनेक आरोप केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: केरळच्या दौऱ्यावरून राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई सोमवारी रात्री उशिरा गोव्यात पोहोचले. आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेले कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे हेही आजच गोव्यात पोहोचले. त्यामुळे गावडेंवर कधी कारवाई होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच गावडे यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या साऱ्याचे खापर माध्यमांवर फोडण्याचा प्रयत्न केला.

आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला, असा दावा त्यांनी केला. मी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. मुख्यमंत्री माझे मित्र आहेत, असेही सांगण्यास ते विसरले नाहीत. मात्र, मंत्री गावडे यांच्यावर कारवाई होणार, असे खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढे काय होते, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

गावडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही थेटपणे 'उचलली जीभ लावली टाळ्याला, असे चालणार नाही, कारवाई तर होणारच' असा स्पष्ट इशारा दिला होता.

फोंडा येथे झालेल्या प्रेरणा दिन कार्यक्रमात गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर तोंडसुख घेताना अनेक आरोप केले होते. हे खाते खुद्द मुख्यमंत्र्यांकडे असल्याने ते आरोप मुख्यमंत्र्यांवर झाल्याचे चित्र निर्माण झाले आणि गावडे यांच्यावर कारवाईसाठी भाजप पक्ष संघटनेकडूनही दबाव येऊ लागला आहे.

या सगळ्या प्रकरणाची कल्पना पक्षश्रेष्ठींना मुख्यमंत्री कार्यालय आणि प्रदेशाध्यक्षांकडून देण्यात आली आहे. गेले काही महिने चर्चेत असलेला मंत्रिमंडळ फेरबदल यानिमित्ताने करावा, असाही एक सूर भाजपमध्ये आहे. मात्र, कारवाई केवळ गावडे यांच्या पुरतीच ठेवावी, असा विचार मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांचा आहे.

सुरुवातीला राज्यपाल केरळच्या दौऱ्यावर असल्याने तत्काळ कारवाई करता येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले होते. गावडे हेही राज्याबाहेर दौऱ्यावर होते. ते परत आल्यावर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना राजीनाम्याची सूचना करण्यात येईल, असेही भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे होते. आता राज्यपाल आणि गावडे हे दोघेही राज्यात पोहोचल्याने आता कारवाई केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ते गावडेंनाच विचारा

मुख्यमंत्री मंत्री गोविंद गावडे मला जरूर भेटले; परंतु काय झाले ते त्यांनाच विचारा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे गावडेंवर नेमकी कारवाई कशा पद्धतीची होईल, यासंदर्भात अनेक तर्क व्यक्त करण्यात येत आहेत.

"मंत्री गावडे यांची बाजू मी उद्या ऐकून घेईन. त्यानंतर पुढील कारवाई होईल. सविस्तर अहवाल श्रेष्ठींना पाठविला आहे," असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT