Goa Politics: पत्रकार परिषदेत बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्ते एल्वीस गोम्स. सोबत पेडणेचे कॉंग्रेस नेते विठू मोरजकर व इतर Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: पेडणे तालुक्यातील लाखों चौ.मी. जागेची विक्री संशयाच्या घेऱ्यात

जमिन विक्रीची जलद चौकशी करण्याची प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते एल्वीस गोम्स यांची मागणी

Dainik Gomantak

Goa Politics: पेडणे तालुक्यातील सुमारे ५० लाख चौ.मी. जागेची विक्री संशयास्पदरित्या (Land Issues in Pernem) केली गेली आहे. सरकारने (Goa Govt) न्यायालयीन आयोग स्थापन करुन या जमिन विक्रीची जलद चौकशी करावी. अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते एल्वीस गोम्स (GPCC Spoke person Elvis Gomez) यांनी केली आहे. आज पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोम्स म्हणाले की, भाजप सरकारने (BJP Govt) गेल्या दहा वर्षात पेडणे तालुक्यात मोपा विमानतळ, स्पोर्ट सीटी, इलेक्ट्रोनिक सीटी, आयुष इस्पितळ आदिसाठी लोकांच्या जमीनी संपादन केल्या. अद्याप एकही प्रकल्प पुर्ण केलेला नाही. जमनी मालकांना व कुळांना योग्य तो मोबदला दिलेला नाही. अद्यापही ६० टक्के लोकांना जमिनीचा मोबदला दिलेला नाही. असा दावा गोम्स यांनी यावेळी केला.

मोपा विनातळाला सलग्न रस्ता पुर्वी नव्हता ,आता तो बांधण्यात येतोय. त्यासाठी लोकांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. हा रस्ता या भागात गोव्याबाहेरील लोकांनी जी लाखो चौ. मी. जागा विकत घेतली आहे. त्यांच्यासाठी असून या जमिनी विकत घेण्याचा प्रक्रियाच संशयास्पद असल्याने त्याची न्यायालयीन आयोग स्थापून जलद चौकशी होणे गरजेचे असल्याचे गोम्स म्हणाले. गेल्या पाच वर्षात राज्यात ५ हजार जमीन विक्रीची प्रकरणे झाली असून परराज्यातील लोकांना जमीनी विकणारे एक रॅकेट गोव्यात कार्यरत असून त्यात मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी व काही परराज्यातील धनाड्य बिल्डर सहभागी असल्याचा आरोप यावेळी गोम्स यांनी केला. एक चौदाच्या उताऱ्यावर नाव असले तरी जमीन विकली जाऊ शकत नाही. मात्र गोव्यात असे अनेक प्रकार घडल्याचे सांगून भाजपने या विषयावर उत्तर देण्याची मागणी गोम्स यांनी यावेळी केली. यावेळी पेडणे येथील कॉंग्रेस नेते विठू मोरजकर व इतर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT