Goa Politics  Dainik Gomantak
गोवा

गोवा भाजपमध्ये 'मास भरती' होणार; मुख्यमंत्री सावंत यांचा दावा

नुकतेच वास्कोचे अपक्ष उमेदवार कृष्णा साळकर यांनी व साळीगावचे माजी आमदार जयेश साळगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: गोव्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सांगितले की, "जवळपास आठ ते दहा मोठ्या राजकीय (Political) नेत्यांना भाजपमध्ये (BJP) सामील व्हायचे आहे कारण हा सर्वात मोठा लोकशाही पक्ष आहे. भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्व नेत्यांचे आम्ही स्वागत करतो."

पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाचे प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळात फेरबदल होणार का, असे विचारले असता सावंत गूढपणे म्हणाले, "तुम्हाला तसा विचार करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता".

"येत्या दोन महिन्यांत अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बर्‍याच लोकांना भाजपमध्ये सामील व्हायचे आहे. आम्ही त्यांना थांबायला सांगितले आहे. एक एक करून पक्ष प्रवेशाच्या तारखा देण्यात येतील," मुख्यमंत्री म्हणाले.

नुकतेच वास्कोचे अपक्ष उमेदवार कृष्णा साळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर साळीगावचे माजी आमदार जयेश साळगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया चषकातील सुपर-4 फेरीचे सामने निश्चित, भारत 'या' संघांविरुद्ध भिडणार; संपूर्ण वेळापत्रक पाहा

K Vaikunth: हिंदी सिनेमासाठी 3 दशकांपेक्षा अधिक योगदान देणारे, महान गोमंतकीय सिनेमॅटोग्राफर 'के. वैकुंठ'

Nano Banana Image: नवीन ट्रेंड आला! AI वरून 15 रंगांच्या साड्यांमधले फोटो बनवले; गरजेचा, सुरक्षेचा विचार कुणी केला का?

Dashavtar Movie: गोव्यातल्या लोकांनाही आपला वाटेल असा, पर्यावरणाची ‘दशा’ दाखवणारा 'दशावतार'

Parshuram Statue: चोपडे सर्कलवर उभारणार परशुरामाचा पूर्णाकृती पुतळा! जीत आरोलकरांना दिली माहिती; जानेवारीपर्यंत करणार काम पूर्ण

SCROLL FOR NEXT