Minister Nilkanth Halarnkar DIP
गोवा

Goa Politics: स्वार्थासाठी मंत्री नीळकंठ हळर्णकरांकडून पदाचा गैरवापर; माजी आमदाराचा गंभीर आरोप!

Serious allegations against Nilkant Halarnkar : थिवीचे आमदार तथा मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आपल्या पदाचा वापर, स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक प्राप्तीसाठी करून घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tivim News: थिवीचे आमदार तथा मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आपल्या पदाचा वापर, स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक प्राप्तीसाठी करून घेतला आहे. हाऊसिंग-बोर्ड, कोलवाळ येथे हळर्णकरांच्या शैक्षणिक संस्थेला लागूनच, हळर्णकरांनी आपले एकमजली राजकीय कार्यालय उघडले आहे.

हे कार्यालय बेकायदा आहे. त्याला पंचायतीची एनओसी नाही तसेच सेटबॅक सोडलेले नाही, असा आरोप माजी आमदार किरण कांदोळकर यांनी केला. याप्रकरणी आपण संबंधित यंत्रणेकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बुधवारी म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या हळर्णकर यांनी हाउसिंग बोर्ड तसेच इतरत्र मिळून कोट्यवधीच्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत.मुळात ते स्वतःला गरीब घराण्यातील व्यक्ती म्हणतात, मग इतकी संपत्ती त्यांच्याकडे आल्या कुठून? हा प्रश्न मी थिवीवासीयांतर्फे होत असल्याचे कांदोळकर म्हणाले.

मंत्री हळर्णकरांनी २०२०मध्ये कोलवाळमध्ये महामार्गलगत १कोटीत ४८५०चौ.मी. जागा घेतली. तिथे त्यांना पेट्रोल पंप सुरू करायचेय. त्याला आडकाठी येऊ नये म्हणूनच हळर्णकर या हाउसिंग बोर्डकडे जाणाऱ्या क्रॉसिंगवर उड्डाणपूल येऊ दिला नाही, असा आरोप कांदोळकरांनी केला.

थिवीकर हळर्णकरांना घरी पाठवणार...

मंत्री नीळकंठ हळर्णकर हे सध्या वैफल्यग्रस्त बनलेत. कारण, थिवीतून ग्रामस्थांनी सनबर्न तसेच खासगी विद्यापीठाला विरोध केलाय. परिणामी हळर्णकरांना या प्रकल्पातून पैसे मिळणार होते ते मिळणार नाहीत.त्यांनी निवृत्तीची तयारी यातून योजिली होती, अशी टीका कांदोळकरांनी केली. हळदोण्यातून लढणे ही माझी चूक होती.

थिवीवासीयांनी माफ केलेय, मी थिवीतून कमबॅक करावे, ही सर्वांची इच्छा आहे. थिवीवासीय हळर्णकरांना यावेळी घरी पाठवतील,असा विश्वास कांदोळकरांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: ‘वुमन सेफ्टी अँड सिनेमा’ सत्रात मान्यवरांची ‘सेफ बॅटिंग’! 'पॉवर प्ले आहे पण..', भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT