MGP Leader Pravin Arlekar with the office bearers of Pernem MGP. (Goa Politics) Nivrutti Shirodkar / Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना प्रश्न सोडवता येत नसतील तर सरकारसकट त्यांनाही घरी बसवू

मगोचे सरकार आल्यास चोवीस तास पाणी, वीज तसेच स्थानिकाना रोजगार व्यवसाय देण्यासाठी प्राधान्य (Goa)

Nivrutti Shirodkar

पेडणे तालुक्यातील राखीव मतदार संघाची (Pernem Constituency) मागची वीस वर्षे प्रतिनिधित्व करूननही पाण्याची समस्या (Issues of Pernem) उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Goa Deputy CM Babu Ajgaonkar) यांना सोडवता नाहीये. आता जनतेने सरकारासकट आमदारही बदलण्याची वेळ आली आहे, आणि येत्या काळात मगोचे सरकार (MGP Govt) आले तर अगोदर पेडणे मतदार संघात चोवीस तास पाणी, वीज (24Hrs Water & Electricity) आणि स्थानिकाना रोजगार व्यवसाय (Jobs for Locals) देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही पेडणे मगोचे नेते प्रवीण आर्लेकर (Pernem MGP Leader Pravin Arlekar) यांनी कोरगाव येथे 30 जुलै रोजी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना दिली. चांदेल येथील पाणी प्रकल्पातून (Chandel Water Project ) येणारे पाणी पुरवठ्यावर वारंवार व्यत्यय येत आहे , पूर आला कि पाणी गायब , कळणे येथील खाण कोसळली तरीही चांदेल पाणी प्रकल्पावर विपरीत परिणाम होत आहे . त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मगो नेते प्रवीण आर्लेकर उत्तर देत होते .

प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले कि ज्या दिवशी तिळारी धरणाचे पाणी सोडले व सोडणार याची जाणीव या मतदार संघाचे आमदार आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना माहिती असायला हवी होती , या पुरामुळे जी पाण्याची गैरसोय झाली त्यावर पर्यायी व्यवस्था आमदार या नात्याने त्यांनी करायला हवी होती , ते अपयशी ठरले , लोकप्रतिनिधीला जमत नसेल तर त्यांनी सांगावे आम्ही पाण्याची समस्या सोडवू शकतो . पाणी सोडणार म्हणून कळवूनही पाणी विभागाने ते पंप वरती काढून ठेवायला हवे होते ते ठेवले नाही परिणामी त्या चंदेल पाणी प्रकल्पाच्या पंपापर्यंत पाणी पोचून ते पाण्याखाली गेले आणि दोन दिवस नव्हे तर चारदिवस पाणी आणि आता पुन्हा परत पाण्याची समस्या निर्माण झाली त्यावर अजूनपर्यंत सरकारने पर्यायी व्यवस्था केली नाही सरकार झोपा काढत आहे असा दावा आर्लेकर यांनी केला. (Goa Politics)

जनतेला पाणी वाढवण्याची क्षमता असताना अतिरिक्त पप्रकल्पाचे भूमिपुजन झाले त्याचा आजपर्यंत उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पाठपुरावा का केला नाही असा प्रश्न प्रवीण आर्लेकर यांनी उपस्थित केला . उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे केवळ नारळ फोडण्यासाठी प्रसिद्ध आहेत , ज्या प्रकल्पांचे नारळ फोडले त्या कामाची सुरुवात तरी झाली कि नाही हे त्यांनी तपासून पाहण्याचे आवाहन केले. आमदाराला आता बदलण्याची गरज आहे . आणि ते काम पेडणेकर करतील असा दावा आर्लेकर यांनी उपस्थित केला , कळणे माईन कोसळल्यानंतर परत एकदा पाण्याची गैरसोय झाली , त्यावर आमदाराने आणि सरकारने काहीच उपाय योजना केली नसल्याचा दावा केला. यावेळी माजी सरपंच सुदीप कोरगावकर , मगो प्रवक्ते उमेश तळवणेकर , नरेश कोरगावकर उपस्थित होते .

मगोचे प्रवक्ते उमेश तळवणेकर यांनी बोलताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे मौनी बाबा आहेत , ते काही बोलत नाही , मात्र कार्यालयात बसून त्याचे कर्मचारी ज्ञानेश्वर परब हे बसून कुणाच्याही नावाने पत्रके काढतात , आणि कुणाचाही नावावर खपवतात , असा दावा उमेश तळवणेकर यांनी केला . बाबू आजगावकर हे स्वताच्या गाडीतून येत नाहीत सरकारचा येतात किंवा एम व्ही. आर कंत्राटदराने दिलेल्या वाहनाने येतात त्यामुळे रस्त्यांच्या खड्ड्यातील धक्के त्यांच्या मालकीच्या वाहनांना बसत नाही तर सरकारी वाहनाना बसतो , मगोने रस्त्याविषई आंदोलन केले तर बाबूंच्या नाकाला मिरच्या झोबतात असा दावा उमेश तळवणेकर यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT