Girish Chodankar BJP Goa Allegation Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

Girish Chodankar statement on BJP: सासष्टीतील धर्मनिरपेक्ष मते फोडण्यासाठी काही नेत्यांना पुढे करून नवा राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी भाजपने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असा गंभीर आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : सासष्टीतील धर्मनिरपेक्ष मते फोडण्यासाठी काही नेत्यांना पुढे करून नवा राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी भाजपने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.

या आरोपासदंर्भात ‘गोमन्तक’ने विचारणा केली असता, ‘काही दिवस थांबा. मी ज्यांच्याविषयी बोलत आहे, त्यांची नावे एका महिन्याच्या आत स्पष्ट होतील आणि जनता त्यांना नाकारेल’ असा दावा चोडणकर यांनी केला.

भाजप आपल्या कामगिरीच्या बळावर मते मागू शकत नसल्याने धार्मिक ध्रुवीकरण आणि विरोधकांमध्ये फूट पाडण्यासाठी ‘प्रॉक्सी’ पक्ष उभे करण्याचे राजकारण करत आहे. सासष्टीतही धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी नव्या पक्षाचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला.

आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवारांमुळे मतांचे विभाजन होऊ शकते, या प्रश्नावर चोडणकर म्हणाले की, गोव्यातील जनता अशा राजकारणाला नाकारेल. राज्यातील जनमत लक्षात घेऊन काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असून विरोधी पक्ष आणि मित्रपक्षांना चर्चेसाठी निमंत्रणेपाठविण्यात आली आहेत.

भाजपचा पराभव करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाचे आघाडीत स्वागत आहे, असे सांगताना त्यांनी पक्षात नव्या नेत्यांचे स्वागत केले जात असल्याचे नमूद केले. मात्र, नवीन सदस्यांना प्रवेश देताना स्थानिक गट समित्यांच्या नेत्यांना डावलले जाणार नसल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले.

गोव्यातील जनतेने भाजपच्या ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या राजकारणाची जाणीव ओळखली असून आगामी निवडणुकीत जनता सूज्ञपणे मतदान करून काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT