Goa minister portfolios Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: कामतांना पीडब्ल्यूडी, तवडकरांना क्रीडा? मुख्यमंत्र्यांचा नेमका कौल काय? गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

CM Pramod Sawant cabinet reshuffle: माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि माजी सभापती आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

Akshata Chhatre

Goa Cabinet Reshuffle: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला गोव्याच्या मंत्रिमंडळातील फेरबदलाचा विषय आता अखेर संपुष्टात आलाय. माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि माजी सभापती आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून, आता त्यांना कोणती खाती मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवार, २५ ऑगस्ट रोजी यावरचा पडदा दूर होऊन खात्यांचे चित्र स्पष्ट होईल.

दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांच्याकडे कोणती खाती?

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिगंबर कामत यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, मुख्यमंत्री असतानाही त्यांनी अर्थ आणि गृह ही महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली नव्हती. त्यांच्या या वक्तव्याने, ते या खात्यांवर अप्रत्यक्षपणे दावा करत असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही दोन्ही महत्त्वाची खाती स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले त्यामुळे, दिगंबर कामत यांना सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), पर्यावरण आणि कायदा ही खाती मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, मंत्री रमेश तवडकर यांना क्रीडा, आदिवासी कल्याण यांसारखी महत्त्वाची खाती मिळू शकतात. या व्यतिरिक्त त्यांना आणखी एक महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता आहे, अशीही माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

फेरबदलाचे कारण आणि पार्श्वभूमी

तत्कालीन क्रीडा, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यानंतर आणि त्यानंतर माजी मंत्री अलेक्स सिक्वेरा यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्यानंतर ही दोन पदे रिक्त झाली होती. या रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत याविषयी चर्चा केली. या चर्चेनंतरच नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.

काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळात झालेला हा आणखी एक मोठा बदल मानला जातो. हा फेरबदल केवळ रिक्त जागा भरण्यासाठी नसून, राजकीय समीकरणे आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. नव्या मंत्र्यांच्या कामगिरीवरच गोव्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरेल असेही मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT