Goa Politics
Goa Politics Dainik Gomantak
गोवा

तुळसीदास गावस मुळे भाजपची ताकत वाढली अन्यथा...

दैनिक गोमन्तक

मोरजी Morjim : पेडणे मतदार संघात राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत आहेत, खुद्द भाजपाचे जुने कार्यकर्त्ये आता आम्हाला स्थानिक उमेदवार द्या म्हणून मागणी करत आहेत (Goa Politics) तर त्यांचे काय चुकले? या मंडळींनी पेडणे (Pernem) मतदार संघात भाजपा (BJP) पक्ष तळागाळात पोचवला, 2017 च्या निवडणुकीनंतर भाजपचे अस्तित्व पेडणे मतदार संघात धोक्यात आले त्या काळात एकाएकी चान्देल्चे पंच सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्ये तुळसीदास गावस यांनी आपल्या खांद्यावर पक्षाची धुरा सांभाळून कार्यकर्त्यांना संघटीत करण्याचे काम अविरत केले.

जे पक्षापासून दूर आहेत त्याना संघटीत करण्याचे काम त्यांनी केले, जे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना जमले नाही. सध्या तुळसीदास गावास यांच्यावर पक्षांतर कारवाई करण्यासाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babau Ajgaonkar) यांनी प्रयत्न चालवलेले आहेत.

कारवाई केली तर पक्षाची मोठी हानी

तुळसीदास गावस यांनी पेडणे मतदार संघात कोरोनाच्या काळात अविरत आपला जीव धोक्यात घालून पक्षाकडून कोणताही निधी न घेता पदर मोड करून कार्य सुरु केले अनेकाना मदत केली, कला साहित्य सांस्कृतिक सामाजिक कार्यात योगदान देताना कुणाची आरोग्याची समस्या, त्याच्या ऑपरेशनसाठी आर्थिक मदत, गरिबाला उच्चशिक्षण घेताना जर अडचण आली तर त्याला मोठी आर्थिक मदत त्यांनी केली व करत आहेत. त्याचा ते कुठेच गव गवा करत नाहीत, किंवा प्रसिद्धी घेत नाहीत. त्यांची लोकप्रियता पाहता तेही जर मतदार संघ सर्वसाधारण झाला तर पुढील निवडणुकीत आमदार बनू शकतात आणि त्यांच्यात काम करण्याची आणि आमदारकीची क्षमता आहे. म्हणून त्यांचे काही विरोधक विनाकारण पक्षाकडे खोट्या तक्रारी करून भाजपाच भाजपची हानी करू पाहत आहेत.

भाजपा पेडणे अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी पेडणे मतदार संघात भाजपची जबरदस्त ताकत निर्माण केली आहे. काही विरोधक त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पक्षाकडे चुकीची माहिती देतात. आणि जर त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस पक्षाने केले तर निवडणुकीत पक्षालाच जबरदस्त किंमत मोजावी लागणार आहे. सध्या तुळसीदास गावस यांच्याकडे पेडणे मतदार संघातील सरपंच पंच आणि उपसरपंच 40 तर शेकडो कार्यकर्त्ये जुने भाजपा समर्थक त्याच बरोबर नवीन भाजपचे कार्यकर्त्ये त्यांच्यासोबत आहेत. त्यांनी पक्षासाठी एवढी ताकत तयारी केली त्यांनी किमान 5000 पेक्षा जात मते आपल्या बाजूने वळवलेली आहेत, आणि त्यांच्यावर जर कारवाई झाली तर हि पाच हजार निर्णायक मते भाजपला हानी पोचवू शकतात.

तुळसीदास गावस हे भाजपसाठी अहोरात्र काम करतात स्वताचा पैसा मोडतात, जुन्या भाजपा कार्यकर्त्याना संघटीत करण्याचे ते काम करतात त्याच कालावधीत जाणकार कार्यकर्त्यांनी जर स्थानिक उमेदवार मागितला तर त्याचे काय चुकले, त्याचा दोष गावस याना देवून काय फायदा उलट पक्षाची प्रचंड हानी होणार आहे. आजही जेष्ठ भाजपा आणि नवीन कार्यकर्त्ये येणाऱ्या निवडणुकीत स्थानिक उमेदवार द्यावा अशी मागणी करतात आणि पत्रकार परीशध घेवून मागणी करतात त्यावरून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी कार्यकर्त्याना किंवा तुळसीदास गावास याना दोष देवून चालणार नाही. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे भाजपात गेले तेव्हा किंवा त्यानंतर त्यांनी स्थानिक भाजपा कार्यकर्त्ये नेत्याना विशावासात घेतले का किंवा एक तरी बैठक घेवून जुन्या कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत का, यावरही चिंतन करण्याची गरज आहे.

तुळसीदास गावास यांच्यावर अन्याय

तुळसीदास गावस हे भाजपचे कट्टर समर्थक, ते त्यांनी चांदेल पंचायतीतही आपले तीन पंच सदस्य निवडून आणले, मात्र त्यांनी सरपंच होण्याची अपेक्षा केली तर काय चुकले मात्र त्याना सरपंच बाबू आजगावकर यांनी ठरवले असते तर केले असते, पण गावस यांनी कधीच शब्द स्वतासाठी टाकला नाही. त्यानंतर जिला पंचायतीच्या निवडणुकीत तोरसे मतदार संघ जाणून बुजून महिलासाठी आरक्षित ठेवून पुन्हा एकदा तुळसीदास गवस जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीला इच्छुक होता म्हणून त्यांचाही पत्ता कट करण्यात आला. तरीही त्यांनी भाजपचाच उमेदवार विजयी करण्यासाठी काम केले. आज त्याच्या बाजूने पाच हजार मतदार आहेत त्यांनी ठरवले तर पर्रीवर्तन घडवू शकतात. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि मंडळ अध्यक्ष तुळसिदास गावस या दोन नेत्यांच्या बाबतीत विचार केला तर गावस हे भाजपला जवळ आहे, तर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना कोणताही राजकीय पक्ष महत्वाचा वाटत नाही, त्यांनी पक्षांतर केले ते विकासासाठीच ते स्वता सांगतात.

जर गावस यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई झाली तर त्याचा फटका उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनाच बसू शकतो असे सध्यावातावरण निर्माण झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT