Congress leader statements Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'ओठांवर गांधी, मनात नथुराम' काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली! "राजकारणात RSSला ओढू नका" वेर्णेकरांचा पटकरांना कडक इशारा

RSS involvement in Politics: गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी भारतीय जनता पक्ष आणि संघावर थेट टीका केली, तर भाजपचे नेते गिरीराज पै वेर्णेकर यांनी त्यांना अत्यंत कठोर भाषेत उत्तर दिले

Akshata Chhatre

पणजी: २ ऑक्टोबर या विशेष दिवशी महात्मा गांधी यांची जयंती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) शताब्दी असे दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रम एकत्र साजरे होत असल्याने गोव्याच्या राजकारणात गदारोळ झाला. या निमित्ताने गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी भारतीय जनता पक्ष आणि संघावर थेट टीका केली, तर भाजपचे नेते गिरीराज पै वेर्णेकर यांनी त्यांना अत्यंत कठोर भाषेत उत्तर दिले आहे.

काँग्रेस अध्यक्षांचा भाजपवर 'दुट्टपीपणा'चा आरोप

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणावर निशाणा साधला. पाटकर म्हणाले की, भारतीय जनता पक्ष केवळ भाषणांमध्ये "मी गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो आणि गांधीजींच्या विचारांवरच देश पुढे जाईल," असे वाक्यप्रयोग करतो. मात्र, त्यांच्या मनात मात्र नथुराम गोडसे आहे.

पाटकर यांनी थेट संघाच्या शताब्दी उत्सवावर बोट ठेवत भाजपवर टीका केली. "ज्या माणसाने गांधीजींची हत्या केली, त्याच संघाची शताब्दी आज साजरी केली जातेय. याला भाजपचा दुट्टपीपणाच म्हटला पाहिजे," असे जोरदार वक्तव्य पाटकर यांनी केले.

'गटर राजकारण थांबवा'; भाजपकडून कायदेशीर प्रत्युत्तर

पाटकर यांच्या या गंभीर आरोपांना भाजपचे नेते गिरीराज पै वेर्णेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी पाटकर यांच्यावर 'गटर राजकारण' (Gutter Politics) करण्याचा आरोप केला. वेर्णेकर यांनी काँग्रेस अध्यक्षांना संघर्षातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओढणे थांबवण्याची सक्त ताकीद दिली आहे.

गिरीराज पै वेर्णेकर यांनी कायद्याचा आणि इतिहासाचा हवाला देत देत पटकरांना खडे बोल सुनावले आहेत. "प्रत्येक कायदेशीर, ऐतिहासिक आणि न्यायालयीन चौकशीतून हे स्पष्ट झाले आहे की, महात्मा गांधींच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचा कोणताही संबंध असल्याचे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या क्षुल्लक राजकीय भांडणातून संघाला बाहेर ठेवा," असे ते म्हणाले. वेर्णेकर यांनी पुढे म्हटले की, "तुमची काँग्रेस अध्यक्षपदाची खुर्ची वाचवण्याची धडपड तुम्हाला १०० वर्षे भारतासाठी समर्पित असलेल्या संघटनेची बदनामी करण्याचा हक्क देत नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: मान्सून म्हणतोय,"राम राम"! गोव्यात पावसाचा जोर घटला; ऑक्टोबर हीटची चाहूल

Charter Flight: पर्यटन हंगामाची दणक्यात सुरुवात! रशियातून पहिले चार्टर विमान मोपा विमानतळावर दाखल; गोव्याचे पारंपरिक आदरातिथ्य

Bethora Road Issue: बेतोड्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय

Goa Politics: खरी कुजबुज, मायकल जागे झाले!

Asia Cup Controversy: पाकडे रडतच बसणार... "कप देतो, पण माझ्याकडूनच घ्यावा लागेल" नक्वींचा बालहट्ट काय

SCROLL FOR NEXT