CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "काँग्रेस लोकांसाठी नाही, तर स्वतःसाठी काम करतेय", CM सावंतांचा हल्लाबोल

Flyover In Porvorim: पर्वरीतील लोकांना उड्डाणपूल झाल्यावर अधिक समाधान मिळणार आहे. आता काही महिनेच त्रास सोसावा लागणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पर्वरीतील लोकांना उड्डाणपूल झाल्यावर अधिक समाधान मिळणार आहे. आता काही महिनेच त्रास सोसावा लागणार आहे. उड्डाणपूल झाल्यावर सर्व वाहने वरून जातील, तर अंतर्गत मार्ग हा पर्वरीतील लोकांचा असणार आहे. पर्वरी मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.भाजपच्या पर्वरीतील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी मंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, भाजप पर्वरी प्रभारी रूपेश कामत, उत्तर गोवा प्रभारी सिद्धार्थ कुंकळकर, भाजप पर्वरी मंडळ अध्यक्ष विनीत परब, उत्तर गोवा अध्यक्ष दयानंद कार्बोटकर, मतदारसंघातील सरपंच, पंच आणि कार्यकर्त्ये उपस्थित होते.

पुढील २५ वर्षांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहे. भाजप राष्ट्र प्रथम या तत्वावर काम करते. आमदार रोहन खंवटे हे बिनशर्त भाजपमध्ये आले आणि कायमस्वरूपी ते भाजपचे झाले असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. attractive काँग्रेसवाले लोकांसाठी काम करत नाही तर स्वतःसाठी काम करतात. आम्हाला राहिलेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात भाजपचे २०२७ मध्ये २७ निवडून आणायला हवे.

मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, पहिल्यापासून आमचे लोक आमची खरी शक्ती म्हणून २०१२ पासून सुरू केली आणि कुटुंब म्हणून वाटचाल केली आहे. चांगल्या वाईटात आम्ही साथ दिली आहे. हे सबंध एवढे घट्ट झाले की आज आम्ही कुणीही एकमेकांना हक्काने फोन लावतो.

विनीत परब म्हणाले की, पर्वरी भाजपतर्फे १३ हजार कार्यकर्त्यांची नोंदणी करू शकलो आणि १३८ सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी करू शकलो. संघटन मजबूत असल्यानेच हे आम्ही करू शकलो.

काँग्रेसवाले लोकांसाठी काम करत नाही तर स्वतःसाठी काम करतात. आम्हाला राहिलेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात भाजपचे २०२७ मध्ये २७ निवडून आणायला हवे. यामध्ये कार्यकर्त्यांची भूमिका फार महत्वाची आहे. - डॉ.प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

काँग्रेसने आजवर कसे राष्ट्र आणि राज्य तोडावे हे सांगितले, परंतु देश कसा पुढे न्यावा हे नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतात. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी २०२७ मध्ये २७ अशी घोषणा आताच केली आहे. तर आम्ही प्रत्येकाने आपले काम आणि जबाबदारी पार पाडली तर पूर्ण कामे सोपी होतील. -रोहन खंवटे, पर्यटन मंत्री

मी भाजप कार्यकर्ता का हे प्रथम समजून घ्यायला हवे. भाजप कार्यकर्ता हा प्रथम कार्यकर्ता भाजपचा असतो आणि शेवटपर्यंत भाजपचाच असेल. तो कितीही नाराज असला तरी अखेर भाजपलाच मत देणार. या सर्व नाराज कार्यकर्त्यांनाही आम्ही एकत्र आणायला हवे. -दामोदर नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT