Chandrakant Babu Kavlekar  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांची यादी द्या...'; बाबू कवळेकरांचा एल्टन यांच्यावर हल्लाबोल

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या वीस वर्षात मी काहीही कामे केलेली नाहीत, अशी आमदार एल्टन माझ्‍यावर टीका करतात. पण प्रत्‍यक्षात मागच्‍या अडीच वर्षात एल्‍टन डिकॉस्‍ता यांनी मी उपमुख्‍यमंत्री असताना जी कामे मंजूर करून घेतली होती. ती कामे पूर्ण झाल्‍यावर त्‍यांचे उद्‍घाटन करून श्रेय घेण्‍या व्‍यतिरिक्‍त आणखी काहीही केलेले नाही, असा आरोप माजी उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर यांनी केला आहे.

गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साष्‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना कवळेकर यांनी हा दावा केला. एल्‍टन यांना मी आव्‍हान देतो, मागच्‍या अडीच वर्षात त्‍यांनी स्‍वत:हून प्रयत्‍न करून मंजूर केलेल्‍या कामांची यादी त्‍यांनी घेऊन यावी. आणि मी, स्‍वत: मंजूर करून घेतलेल्‍या कामांची यादी घेऊन येतो. पाहिजे तर ‘गोमन्‍तक टीव्‍’हीवरच हा आमने-सामनेचा फैसला करू असे ते म्‍हणाले. गोमन्‍तकचे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली असून गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या यू-ट्यूब, फेसबुक आणि इन्‍स्‍टाग्रामवर ती पहाण्‍यास उपलब्‍ध आहे.

कवळेकर म्‍हणाले, मी सातवेळा केपे मतदारसंघातून निवडून आलो. मात्र बहुतेक काळ विरोधी पक्षातच राहिलो. भाजपात प्रवेश केल्‍यानंतर मी उपमुख्‍यमंत्री बनून माझ्‍याकडे स्‍वतंत्र खाती आली. त्‍यावेळी मी विकासकामांना सुरुवात केली. मात्र मागच्‍या निवडणुकीत माझा पराभव झाला. असे जरी असले तरी तो निकाल लागला त्‍याचा मतदार आता पश्चात्ताप करू लागले आहेत. यावेळी मी जिंकून आलो असतो, तर मतदारसंघातील विकासकामांना आणखी चालना मिळाली असती. अशावेळी केपे मतदारसंघ विरोधी आमदाराकडे गेल्‍याने केपेकरांची पाच वर्षे फुकट गेली अशी भावना आता केपेतील लोकांमध्‍ये होऊ लागली आहे.

एल्‍टन यांनी निवडून आल्‍यानंतर पहिल्‍या सहा महिन्‍यात केपे मतदारसंघात हॉटमिक्‍स डांबरीकरण कामाचा धडाका लावला होता. त्‍यावेळी त्‍यांनी शुभारंभाचे कित्‍येक नारळ फोडले. मात्र आता ते बंद झाले आहे. याचे कारण म्‍हणजे, त्‍यावेळी मी मंजूर करून आणलेली कामे मार्गी लागली होती. ती कामे संपली आणि नवीन कामे डिकॉस्‍ता यांना करून न घेता आल्‍यामुळे त्‍यांचे काम बंद पडले असे कवळेकर म्‍हणाले.

मी उपमुख्‍यमंत्री असताना मोरपिर्ला, फातर्पा, बाळ्‍ळी व बार्से या पंचायतीसाठी आठ कोटींची वीज यंत्रणेची कामे मंजुर करुन आणली होती. पावणे दोन कोटी रुपये खर्चून केपे क्रीडा संकुलात वॉकिंग ट्रॅक मंजूर केला. आरडीएच्‍या योजनेखाली केपे मतदारसंघातील विविध पंचायतींत ३० कोटींची कामे मंजूर करुन घेतली. ही सर्व कामे माझा पराभव झाल्‍यानंतर मार्गी लागली. ही कामे होत असताना तिथे उभे राहून फोटो काढून घेऊन स्‍वत:ची जाहिरात करण्‍याऐवजी एल्‍टन डिकॉस्‍ता काहीच करु शकले नाहीत, असे कवळेकर म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT