Yuri Alemao pm modi Vijai Sardesai Viresh Borkar Venzy Viegas Dainik Gomantak
गोवा

फातोर्ड्यात विरोधकांचं खलबतं! Cash For Job प्रकरणी आता थेट पंतप्रधानांकडे मागणार दाद

Goa Politics: सध्या गाजत असलेल्या 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्यात मंत्र्यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारीही आहेत ही बाब पुढे आल्यानंतर आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविले.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: सध्या गाजत असलेल्या 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्यात मंत्र्यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारीही आहेत ही बाब पुढे आल्यानंतर आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविले असून त्यांनी आता थेट प्रधानमंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

काल (19 डिसेंबर) सायंकाळी उशिरा सातही विरोधी आमदार फातोर्डा येथील एल्टन डीकॉस्ता यांच्या हॉटेलमध्ये जमून त्यांनी बैठक घेतली. या बैठकीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह एल्टन डीकॉस्ता , कार्लोस फेरेरा आम आदमी पक्षाचे आमदार वेन्झी विएगस आणि क्रुझ सिल्वा, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई तसेच आरजीचे विरेश बोरकर हे उपस्थीत होते.

गोव्यात जे काय सध्या चालू आहे त्याची माहिती आम्ही प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून कळविणार आहोत आणि त्यांनी गोव्यातील लोकांना न्याय द्यावा असे मागणार आहोत. त्याशिवाय या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी एक दिवसाचे विधानसभा अधिवेशन बोलवावे यासाठी सभापतींनाआवाहन करणार असे यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

सभापतीच अन्यायग्रस्त तर ते दुसऱ्यांना कसा न्याय देतील

सभापती रमेश तवडकर यांनी एका मुलाखतीत आपल्यावर अन्याय होत आहे असे म्हटले आहे. सभापतीवरच अन्याय होत असेल तर आम्हा विरोधकांना काय न्याय देऊ शकतील असा सवाल विजय सरदेसाई यांनी केला. यासाठी आम्ही सर्व विरोधक सभापतींना भेटणार आहोत. त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्याचे ते कधी परिमार्जन करून घेतील हे आम्ही त्यांना विचारणार आहोत. त्यांना जर आपल्यावरील अन्याय दूर करता येत नसेल तर त्यांनी त्या पदावर राहणे योग्य नव्हे असे सरदेसाई यांनी यावेळी म्हटले.

भाजप सरकारने ‘कॅश फॉर जॉब' हा घोटाळा करीत राज्यातील तरुणांचा विश्वासघात केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीसाठी न्यायिक समिती नियुक्त करण्याची आम्ही मागणी करूनही हे सरकार अपयशी ठरले आहे. युवकांच्या भविष्यावर हा हल्ला आहे. त्यामुळे 21 रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदानावर या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आहोत. या आंदोलनात सर्व गोमंतकातील जनतेने आणि तरुणांना आपल्या भविष्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ‘एक्स' या समाजमाध्यमातील प्लॅटफॉर्मवरून केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates Today: कॅश फॉर प्लॉटमध्ये अंध युवतीची 8 लाख रुपयांची फसवणूक

IFFI Goa: सिनेमा संस्कृती रुजवण्याच्या संधीची गाडी गोव्याकडून सुटली; असं काय घडलं? वाचा सविस्तर

Goa Tourism: 1990 च्या दशकातील गोव्याची पर्यटनातील मक्तेदारी कशी संपतेय; चेतन भगतने सांगितले नेमकं काय गंडतंय

IFFI Opening Ceremony: लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन!! 55व्या इफ्फीसाठी गोवा सज्ज

Goa Coconut Market: नारळ स्वस्त होईना! दर गगनाला भिडले; वाढत्या महागाईने गोमंतकीय हैराण

SCROLL FOR NEXT