Goa CM Pramod Sawant And J P Nadda Dainik Gomantak
गोवा

Goa Politics News: गोव्यात 'नापास' मंत्र्यांना नारळ? जे. पी. नड्डा प्रगतीपुस्तक तपासणार, मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत

Goa Cabinet Reshuffle: नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनानंतर खात्याला न्याय देऊ न शकणाऱ्या मंत्र्यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

Goa Cabinet Reshuffle

पणजी: विकसित गोव्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल गरजेचा असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केले. यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष येत्या दोन दिवसांत गोवा दौऱ्यावर येत आहेत.

अध्यक्ष नड्डा यांच्या भेटीनंतर गोवा मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांत दृष्टीक्षेपात असलेल्या फेरबदलाच्या शक्यतेने काही मंत्र्यांच्या काळजाची धडधड मात्र वाढली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदलचा विचार केला जाईल असे संकेत दिले होते. त्यातच पावसाळी अधिवेशन आल्याने फेरबदलाचा निर्णय आपसूकच लांबणीवर पडला. अधिवेशनात सत्ताधारी भाजपवर सात विरोधक भारी पडल्याचे दिसून आले.

तर, सरकारला काही विधेयक माघारी घ्यावी लागली. यावरुन कळंगुटचे आमदार मायकल लोबोंनी भाजपला घराचा आहेर देत पक्षात ऑल इज नॉट वेल म्हटले. लोबोंच्या वक्तव्याने पक्षात धूसफूस झाली खरी पण, प्रदेशाध्यक्षांनी त्यांना समज देत विषयावर पडदा टाकला.

अलिकडेच एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये ऑल इज वेल असल्याचे सांगितले. तसेच, मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत देखील सूतोवाच केले. विकसित गोव्यासाठी फेरबदल गरजेचा आहे, पण यासाठी अजून थोडा वेळ लागेल असेही सावंत म्हणाले.

नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनानंतर खात्याला न्याय देऊ न शकणाऱ्या मंत्र्यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. विद्यमान मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांना डच्चू मिळण्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर खुद्द मुख्यमंत्रीच नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा २४ ऑगस्ट रोजी गोव्यात येणार आहेत. चिंबल येथील भाजप मुख्यालयाच्या पायाभरणीसाठी नड्डा गोव्यात असतील. यानंतर मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. नड्डा मुख्यमंत्री सावंत आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्यासोबत चर्चेनंतर फेरबदलाबाबत निर्णय घेतला जाईल.

यामुळे जे. पी नड्डा यांच्या गोवा दौऱ्यानंतर काही दिवसांतच गोवा मंत्रिमंडळात फेरबदल होण्याबाबत चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT