political controversy Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'ब्रिटिशांच्या पक्षाने देशभक्ती शिकवू नये!', BJYM अध्यक्षांनी काँग्रेसला सुनावलं; Watch Video

BJYM president statement: काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये थेट शब्दयुद्ध सुरू झाले असून, या प्रकरणात भाजपकडून इतिहासाचे आणि कायदेशीर दस्तऐवजांचे दाखले दिले जात आहेत

Akshata Chhatre

पणजी: २ ऑक्टोबर या महत्त्वाच्या दिवशी महात्मा गांधी जयंती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) शताब्दी सोहळा असे दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रम एकत्र आल्याने गोव्याच्या राजकारणात वैचारिक गदारोळ माजला आहे. या निमित्ताने काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये थेट शब्दयुद्ध सुरू झाले असून, या प्रकरणात भाजपकडून इतिहासाचे आणि कायदेशीर दस्तऐवजांचे दाखले दिले जात आहेत.

काँग्रेस अध्यक्षांकडून भाजपच्या 'दुटप्पी' धोरणांवर निशाणा

गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजपच्या धोरणांवर थेट टीकास्त्र सोडले. पाटकर म्हणाले की, भारतीय जनता पक्ष केवळ भाषणांमध्ये महात्मा गांधींच्या विचारांवर देश पुढे जाईल, असे ढोंग करतो. मात्र, त्यांच्या मनात नथुराम गोडसे आहे.

पाटकर यांनी थेट संघाच्या शताब्दी उत्सवावर बोट ठेवत भाजपच्या दुटप्पीपणावर जोरदार आक्षेप घेतला. "ज्या संघटनेचा संबंध गांधीजींच्या हत्येशी जोडला गेला, त्याच संघाची शताब्दी आज साजरी केली जातेय, याला भाजपचा दुटप्पीपणाच म्हटला पाहिजे," असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

'इतिहास तपासा' - युवा मोर्चाचा कठोर प्रतिहल्ला

अमित पाटकर यांच्या या आरोपानंतर भाजप युवा मोर्चाचे (BJYM) अध्यक्ष तुषार केळकर यांनी त्यांना अत्यंत कठोर भाषेत प्रत्युत्तर दिले. केळकर यांनी काँग्रेस अध्यक्षांना 'इतिहास आणि कायदेशीर दस्तऐवज तपासून बघण्याची' स्पष्ट विनंती केली आहे.

केळकर यांनी ठणकावून सांगितले की, "सर्वोच्च न्यायालयाने त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गांधीजींच्या हत्येत कोणताही हात नसल्याचा निर्णय जाहीर केला होता." याशिवाय, काँग्रेसच्या निर्मितीवर बोट ठेवत ते म्हणाले, "ब्रिटिश अधिकारी ए. ओ. ह्यूम यांनी काँग्रेस पक्षाची सुरुवात केली होती, त्यामुळे एका परदेशी अधिकाऱ्याने सुरू केलेल्या पक्षाने आम्हाला देशभक्ती शिकवू नये."

'स्वार्थासाठी गांधींचा विचार बाजूला'

त्यांनी काँग्रेसवर स्वार्थापोटी गांधीजींच्या विचारांचा त्याग केल्याचा आरोप केला. "गांधीजींच्या विचारांवर चालणाऱ्या या पक्षाने केवळ स्वार्थासाठी स्वातंत्र्यानंतर गांधीजींची इच्छा असूनही काँग्रेस पक्ष बंद केला नव्हता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जर का कोणाची हत्या केली असेल तर ती राहुल गांधी यांच्या राजकीय पर्वाची," असे अत्यंत बोचरे विधान करत केळकर यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर थेट निशाणा साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT