Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: फोंड्यात राजकीय हालचालींना वेग, ‘आयाराम गयाराम’चे फुटणार पेव; विधानसभा निवडणुकीत रंगणार घमासान!

Goa Assembly Election 2027: फोंडा मतदारसंघात राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून कार्यकर्त्यांना लुभावण्यास सुरुवात झाली आहे.

Manish Jadhav

फोंडा: फोंडा मतदारसंघात राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून कार्यकर्त्यांना लुभावण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक जरी सव्वा दोन वर्षे दूर असली तरी फोंड्यातील इच्छुक उमेदवार आपले वर्चस्व प्रस्थापित करायच्या तयारीला लागले असून यावेळी निवडणूक अटीतटीची होणार, असे संकेत एव्हाना मिळू लागले आहेत.

अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या गोटात आणण्यासाठी अमिषे दाखवली जात आहेत. त्यामुळे आतापासूनच ‘आयाराम-गयाराम’चे पेव फुटले असून ‘कोणी कोणाचा नाही, राजार’या उक्तीचा प्रत्यय येऊ लागला आहे, विशेष म्हणजे प्रत्येकजण पक्षापेक्षा स्वतःला प्रोजेक्ट करण्यात जुंपलेला दिसत असून त्यामुळे फोंड्यात (Ponda) पक्षापेक्षा संबंधित वैयक्तिक व्यक्तीची चर्चा दिसत आहे. हे पाहता कोण कोणत्या पक्षाच्या चिन्हावर रिंगणात उतरले हे सांगणे सध्यातरी कठीण आहे.

दळवी यांनी तर आपण यावेळी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवणारच, अशी घोषणा केली असून ‘अभी नहीं तो कभी नही’ असा एल्गार पुकारला आहे. भाटीकर हे भाजपच्या (BJP) उमेदवारीवर निवडणूक लढवू शकतात, असा प्रवाद असून रितेश कॉंग्रेसचे उमेदवार बनू शकतात, असेही बोलले जात आहे.

राजेश यांनी आपले पूर्ण पत्ते खोलले नाहीत. तरी आपण रिंगणात उतरणार, असा निर्धार केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे फोंड्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. हे पाहता या चतुर्थीत इच्छूक उमेदवार ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणण्याबरोबरच बाप्पा माझी नाव उमेदवारीच्या किनाऱ्याला लावा, असे गणरायाकडे गाऱ्हाणे घालताना दिसले तर आश्‍चर्य वाटू नये.

रायझिंग फोंडा; फोंडा फर्स्ट चर्चेत

‘मगो’ चे फोंड्याचे नेते असूनही डॉ. केतन भाटीकर हे ‘रायझिंग फोंडा’ या संस्थेद्वारे काम करत असून ही संस्था गेली बरीच वर्षे फोंड्यात कार्यरत असल्यामुळे त्यांना सध्या तरी ‘मगो’ चे नाव लावण्याची गरज दिसत नाही. कॉंग्रेस नेते राजेश वेरेकर हे सध्या ‘वेट ॲण्ड वॉच’ वर मोड दिसत असले तरी फोंड्यातल्या राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. तेही आपल्या ‘फोंडा फर्स्ट’या संस्थेतर्फे सामाजिक कार्य करताना दिसतात

प्रोग्रेसिव्ह फोंडाचा ‘दबदबा’

भाजपचे फोंडा गटाध्यक्ष विश्‍वनाथ दळवी यांनी प्रोग्रेसिव्ह फोंडाचा आधार घेतला असून या झेंड्याखाली ते सामाजिक कार्य करताना दिसत आहे. गेल्या तीन महिन्यात या संस्थेने फोंड्यात बराच ‘दबदबा’ निर्माण केला असून आता त्याचे फळ दळवींना मिळते का, हे बघावे लागेल. दळवी हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निकटवर्तीय म्हणून गणले जात असल्यामुळे त्यांचे सामाजिक उपक्रम हे मुख्यमंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू आहेत का, यावरही शहरात तर्कवितर्क सुरू आहेत.

रवी पुत्र रितेश सक्रिय

रवी नाईक हे कृषी मंत्री तथा फोंड्याचे आमदार असल्यामुळे त्यांचे पुत्र तथा येत्या विधानसभा निवडणुकीतील आणखी एक इच्छूक उमेदवार रितेश नाईक यांना तशा कोणत्याही संस्थेचा आधार घेण्याची गरज भासत नसली तरी त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरू केले असून हल्लीच त्यांनी ‘ब्रेस्ट कॅन्सर’वर फोंड्यात शिबिर घेतले होते. माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्या गोटात मात्र सध्या ‘ठंडा ठंडा कुल कुल’ असे वातावरण दिसत असून त्यांची रणनीती स्पष्ट झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa Live Updates: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले!

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

SCROLL FOR NEXT