Amit Patkar criticized Devendra Fadnavis Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोव्यातून कॉंग्रेसवर तोफ डागणाऱ्या फडणवीसांवर पाटकरांचा पलटवार; 'त्यांच्या महायुतीचा पराभव निश्चित...'

Manish Jadhav

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव निश्चित असल्याचे म्हणत गोव्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी टीकास्त्र डागले. पाटकर यांनी आज (26 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेवून फडणवीसांचा समाचार घेतला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महायुतीचा पराभव निश्चित असल्याचे पाटकर म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी, जुने गोवे बगल रस्त्यालगत बांधण्यात येणाऱ्या गोवा भाजप मुख्यालयाच्या इमारतीच्या उद्धाटन समारंभासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. फडणवीसांच्या हस्ते हा समारंभ पार पडला होता. कोनशिला समारंभानंतर फडणवीसांनी गोव्यातून कॉंग्रेसवर तोफ डागली होती. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेस (Congress) यांच्यात राजकीय घमासान सुरु झाले. कॉंग्रेस नेत्यांनी आक्रमकरित्या फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

फडणवीस गोव्यात (Goa) पायाभरणीसाठी आले होते की महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेसाठी 'बॅगा' घेवून जाण्यासाठी? असा सवाल पाटकरांनी पत्रकार परिषदेतून विचारला. लोकशाही लयाला नेण्यामध्ये फडणवीसांचा मोठा वाटा आहे. फडणवीस हे मास्टर ऑफ डिफेक्शन आहेत, असे म्हणत पाटकरांनी फडणवीसांवर हल्ला चढवला.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

'आपण सख्खे शेजारी आहोत, गोवा आणि महाराष्ट्राचे जवळचे नाते आहे. पुढची पन्नास नव्हे तर शंभर वर्षे हे भाजपचे कार्यालय राहणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदारच नव्हे तर भागीदार देखील आपण आहोत', असे फडणवीस म्हणाले होते.

'आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला आहे. शिवाजी महाराज जो मुलूख जिंकत होते त्याठिकाणी एक तटबंदी असलेला किल्ला बांधत होते. हा किल्ला चांगल्या वाईट काळात स्वराज्याचे रक्षण करायचा. आजची लढाई तलवारीची नाही ती बॅलेट बॉक्सची आहे', असे फडणवीस पुढे म्हणाले होते.

'भाजपचे कार्यालय देखील छत्रपतींच्या किल्ल्यासारखंच आहे. जे कार्यालय कुठल्याही क्षणी कारभार चालविण्यासाठी आधार देतं. तसेच, सामान्य नागरिकाला ते आपलं कार्यालय आहे, असं वाटतं. भारतीय जनता पक्षाचे संचलन येथून चालतं हे कळावं यासाठी कार्यालयाचं महत्व असतं', असे फडणवीस आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT