Goa ZP election Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

RGP Congress dispute: रिव्होल्युशनरी गोवन्सच्या अनुपस्थितीमुळे अखेर काँग्रेस-गोवा फॉरवर्ड अशी दुहेरी युतीच निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली

Akshata Chhatre

Goa politics alliance: गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत विस्तृत युती करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र स्पष्ट झाले. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी या तिन्ही पक्षांची युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र रिव्होल्युशनरी गोवन्सच्या अनुपस्थितीमुळे अखेर काँग्रेस-गोवा फॉरवर्ड अशी दुहेरी युतीच निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

निमंत्रण असूनही रिव्होल्युशनरी गोवन्स अनुपस्थित

युतीच्या चर्चेसाठी काँग्रेसने शनिवारी (दि.०६) मिरामार येथील एका हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी रिव्होल्युशनरी गोवन्सच्या नेत्यांना अधिकृतपणे निमंत्रण देण्यात आले होते.

मात्र, नियोजित वेळेनंतरही सायंकाळी उशिरापर्यंत रिव्होल्युशनरी गोवन्सचा एकही प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहिला नाही. यावरून, रिव्होल्युशनरी गोवन्सने काँग्रेससोबत युती न करण्याचा आपला आधीचा निर्णय कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बैठकीला काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्यासह गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई आणि दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

'ही तू-तू-मैं-मैं करण्याची वेळ नाही': विजय सरदेसाई

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकारांसमोर एक महत्वाचे विधान केले. त्यांनी स्पष्ट केले की 'आम्ही काँग्रेस पक्षासोबत युतीत आहोत.' मात्र, विस्तृत विरोधी युती न झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. सरदेसाई म्हणाले, "जिल्हा पंचायत निवडणुका या 'तू-तू-मैं-मैं' (वाद) करण्यासाठी नाहीत.

काँग्रेस, रिव्होल्युशनरी गोवन्स आणि गोवा फॉरवर्ड या तिन्ही पक्षांनी एकत्रित बैठका घेणे आवश्यक होते, पण अशी एकही संयुक्त बैठक झाली नाही. याचा परिणाम म्हणून, आम्ही कधीही एका समान अजेंड्यावर पोहोचू शकलो नाही."

रिव्होल्युशनरी गोवन्सच्या भूमिकेचा सन्मान, पण...

रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी पक्षांतर केलेल्या आमदारांना युतीत घेऊ नये, या भूमिकेवर जोर दिला होता. यावर विजय सरदेसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, "आमचा पक्ष पक्षांतर करणाऱ्यांना संधी देत नाही. रिव्होल्युशनरी गोवन्सचे त्यांचे स्वतःचे मत आणि वैयक्तिक विचार आहेत आणि मी त्यांचा आदर करतो."

परंतु, याचबरोबर त्यांनी राजकारणातील एक वास्तवही मांडले. ते म्हणाले, "राजकारणात व्यक्ती एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे ही सामान्य बाब आहे." सरदेसाईंच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, GFP ने RGP च्या भूमिकेचा आदर करत, वेळेची आणि निवडणुकीची गरज ओळखून काँग्रेससोबतची युती निश्चित करण्याला प्राधान्य दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

Sattari Fire: सत्तरीत आगीचे तांडव! भीषण आगीत घर भस्मसात, 15 लाखांचं नुकसान; आगीचं कारण अस्पष्ट Watch Video

Russian Tourist Murder: 2 रशियनांच्या हत्येनंतर प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये; पर्यटक व्हिसावर क्लब-पबमध्ये काम करणाऱ्यांची होणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT