Goa Politician Sex Scandal Case Dainik Gomantak
गोवा

Goa Politician Scandal: तुमच्या नात्यातील कुठल्याही स्त्रीची अशी नाहक बदनामी झाली असती तर तुम्हाला चालले असते?

मंत्री कथीत सेक्स स्कँडल: त्या महिलेचे गिरीश चोडणकर यांना खुले पत्र

दैनिक गोमन्तक

Goa Politician Sex Scandal Case

गोव्यातील एका मंत्र्याचे कथित सेक्स स्कँडल उघडकीस आणल्याचा दावा करणारे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे नियमित निमंत्रित सदस्य गिरीश चोडणकर यांना त्या महिलेने एक खुले पत्र लिहून तुमच्या नात्यातील एखाद्या महिलेची अशी नाहक बदनामी केली असती तर तुम्हाला काय वाटले असते असा सवाल केला आहे.

या प्रकरणी त्या महिलेने वास्को पोलीस स्थानकावर अज्ञाता विरोधात तक्रार दिली असून आपला फोटो समाज माध्यमावर अपलोड करून आपली बदनामी केली जात असल्याची तक्रार दाखल केली आहे.

चोडणकर यांनी काल एक ट्विट करून भाजपाचा गोव्यातील एक कॅबिनेट मंत्री सेक्स स्कँडलमध्ये गुंतल्याचा आरोप केला होता. एका राजकारणी महिलेचे त्यांनी अपहरण करून आपल्या फार्म हाऊसवर त्याने त्या महिलेला नेले असे म्हटले होते. त्यांनतर एका मंत्र्यांचा आणि एका महिलेचा एकत्रित असलेला फोटो समाज माध्यमावर फिरू लागला होता.

अशी घटना कधी घडलीच नव्हती. चोडणकर यांनी आपले नाव वृथा बदनाम केले आहे असा दावा तिने केला आहे. काँग्रेस नेत्यांच्या अशा वागण्यामुळेच लोकांचा काँग्रेस पक्षावरील विश्वास उडत चालला आहे असाही दावा त्या महिलेने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT