Vijai Sardesai | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: युवा महोत्सवातून नेते तयार व्हावेत ; सध्या समाजाला नेत्यांची गरज

Vijay Sardesai: मडगावात शानदार उद्‍घाटन; रोटरी क्लबचे आयोजन

दैनिक गोमन्तक

Vijay Sardesai: रोटरी क्लब मडगाव मिडटाऊनने आयोजित केलेल्या दोन दिवशीय नक्षत्राज महोत्सवाचे उद्‍घाटन फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. हा शालेय विद्यार्थ्यांसाठीचा महोत्सव रवींद्र भवनमध्ये 26 नोव्हेंबरपासून सुरू झाला. यात नृत्य, संगीत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या उद्‍घाटनानंतर विजय सरदेसाई म्हणाले की, अशा युवा महोत्सवातून नेते तयार व्हायला पाहिजेत. नेत्यांची सध्या समाजाला गरज आहे. असे महोत्सव आयोजित केल्याने वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, वेगवेगळ्या समाजातील विद्यार्थी एकत्र येतात. त्यातून ओळख वाढते, विचारांची देवाण घेवाण होते. परिणामी समाजालाही बळकटी प्राप्त होते.

विद्यार्थी संघटनांमध्ये राजकीय पक्षांचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची मानसिकता ठेवावी. वर्ग नेत्याची निवडसुद्धा निवडणुकीद्वारेच व्हावी, असेही सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसजनांनी 'आप'मध्ये यावे, अरविंद केजरीवालांची काँग्रेस कार्यकर्त्यांना हाक

Goa Road Accident: दोन अपघातांमध्ये तिघे ठार, कुठ्ठाळीत दोघे दुचाकीस्वार तर रामनगर येथे कारचालकाचा मृत्यू

Goa Illegal Dance Bars: बेकायदा डान्‍स बारमुळे गोवा बँकाॅकच्या दिशेने, वेश्‍‍या व्‍यवसायाला प्रोत्‍साहन- अरुण पांडे

ZP Election: रविवार ठरला प्रचाराचा वार, अखेरचे 4 दिवस रंगणार रणधुमाळी; भाजपकडून मुख्‍यमंत्री, दामू, विश्‍‍वजीत, तर 'आप'कडून केजरीवाल मैदानात

Horoscope: यश आणि प्रगतीचा दिवस! 'या' राशींची प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

SCROLL FOR NEXT