Goa Police Campaign Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोवा पोलिस Action Mode मध्ये, मद्यपी, स्मोकर्सची नाही खैर; रात्रीची नाकाबंदी वाढवली, एका रात्रीत 519 जणांना दंड

Road safety enforcement Goa: राज्यातील विविध भागात जिल्हा व वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम तसेच नाकाबंदी पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Sameer Panditrao

Goa police traffic checkpoint and vehicle inspections

पणजी: राज्यातील विविध भागात जिल्हा व वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम तसेच नाकाबंदी पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत सुमारे १२२० वाहनांची नाकाबंदीच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली.

५९१ वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई आली त्यामध्ये ५६ मद्यपींचा समावेश होता. याशिवाय धुम्रपान व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १६० जणांनाही दंड ठोठावण्यात आला.

पोलिस महासंचालक अलोक कुमार व उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी काल दोन जिल्ह्यातील पोलिस स्थानकांसह रस्त्यावरील वाहतूक पोलिसांकडून होत असलेली कारवाई तसेच जिल्हा पोलिसांकडून होत असलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी कामाचा आढावा घेतला.

या कारवाईसाठी जिल्हा व वाहतूक पोलिसांव्यतिरिक्त गोवा राखीव पोलिस, आयआरबी पोलिस तसेच पर्यटन पोलिसांची मदत घेण्यात आली. एकूण ६५८ पोलिस कर्मचारी रात्री रस्त्यावर वाहनांची तपासणी तसेच कारवाईसाठी उपस्थित होते. त्यामध्ये ३९२ जिल्हा, १२२ वाहतूक पोलिस, ११० आयआरबी व ३४ जीआरपी पोलिसांचा समावेश होता.

पोलिसांची वाहनाने तसेच पायी गस्तही सुरू होती. किनारी भागातही पोलिसांनी गस्त घातली. राज्यातील संवेदनशील अशा ७१ लहानसहान ठिकाणी पोलिसांची गस्त सुरू ठेवली होती.

६१ जागी नाकाबंदी; संवेदनशील ठिकाणी गस्त

या मोहिमेवेळी ६१ ठिकाणी नाकाबंदीच्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. याशिवाय वाहनाने तसेय पायी गस्त सुरू होती. किनारपट्टी भागातही गस्त घालण्यात आली. संवेदनशील अशा ७१ लहानसहान ठिकाणी पोलिसांची गस्त ठेवण्यात आली. वाहनांच्या वेगावर नियंत्रण तसेच लोकांना सुरक्षा देण्याच्या हेतूने ही मोहीम राबवण्यात आली. दरदिवशी राज्यात पोलिस गस्त सुरुच राहील मात्र अधुनमधून नाकाबंदी केल्या जातील, अशी माहिती पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Crime: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

SCROLL FOR NEXT