Goa Police Dianik Gomantak
गोवा

Goa Police: पहलगाम हल्ल्यानंतर गोवा पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; विविध भागात कसून तपासणी, 21 जणांना अटक

Pahalgam Terrorist Attack: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना फोन करून सूचना दिल्यानंतर पोलिसांनी राज्यात ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

तिसवाडी: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवले जात आहे. राज्यात सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. संशयास्पद व्यक्तींची तपासणी केली जात आहे.

सांताक्रूझ मतदारसंघातील चिंबल, मेरशी आणि इंदिरानगर परिसरात जुने गोवे पोलिसांनी २५२ जणांची चौकशी करून २१ जणांना अटक केली. त्याशिवाय १२ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती जुने गोवे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना फोन करून सूचना दिल्यानंतर पोलिसांनी राज्यात ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

मुख्यमंत्र्यांनीही शनिवारपासून कोम्बिंग ऑपरेशन राबविले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचाच भाग म्हणून जुने गोवे पोलिसांनी सांताक्रुझ मतदारसंघातील संवेदनशील भागात जाऊन कारवाई केली आहे. राज्यात जे परप्रांतीय राहत आहेत त्यांच्याकडील ओळखपत्राची तपासणी केली जात आहे. संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्याची चौकशी केली जात आहे.

खोर्लीत गांजा जप्त, दोघांना अटक

जुने गोवे पोलिसांनी अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली. त्यांच्याजवळील २.३५ लाखांचा गांजा जप्त केला. मळार-खोलीं येथे रेल्वे उड्डाणपुलाजवळून संशयित नीरज कुमार (३८, मूळ-बिहार) आणि उपेंद्र राम (४०, मूळ-बिहार) यांना रंगेहाथ पकडले. नीरज कुमारकडून १.०२० किलोग्रॅम, तर उपेंद्र रामकडून १.०१५ किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांनी अमलीपदार्थ विरोधी कायदा १९८५ अंर्तगत गुन्हा नोंद केला आहे.

रेल्वे स्थानकांवर तपासणी

पेडणे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे. मालपे-पेडणे रेल्वे स्थानकावरील प्रवासी व पर्यटकांना सुरक्षा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे तसेच संशयास्पद व्यक्तींची तपासणी करणे या उद्देशाने पेडणे पोलिस काम करीत आहेत. दुसरीकडे, कोकण रेल्वेच्या पोलिसांनीही मडगाव रेल्वे स्थानकावर तपासणी मोहीम राबविली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT