Goa Safety System Dainik Gomantak
गोवा

Goa: गोव्यात आता दहशतवादी प्रचारावर कडक नजर; 'रॅडिकल कंटेंट अ‍ॅनालायझर’ तंत्रज्ञानाने पोलिसांचे हात होणार बळकट

Radical Content Analyzer: गोवा पोलिस आणि बिट्स पिलानी, गोवा कॅम्पस यांच्या सहकार्याने ‘रॅडिकल कंटेंट अ‍ॅनालायझर’ नावाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.

Sameer Panditrao

Radical Content Analyzer Goa Police Security System

पणजी: गोवा पोलिस आणि बिट्स पिलानी, गोवा कॅम्पस यांच्या सहकार्याने ‘रॅडिकल कंटेंट अ‍ॅनालायझर’ नावाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. या साधनाच्या मदतीने ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमांवरील २५ मिनिटांपर्यंतच्या व्हिडिओंचे परीक्षण करून दहशतवादी प्रचाराला प्रतिबंध घालता येणार आहे. हे साधन विकसित झाल्यास गोवा पोलिस हे तंत्रज्ञान वापरणारे देशातील काही मोजकेच कायदा रक्षक दलांपैकी एक ठरणार आहे.

आतापर्यंत १७० हून अधिक व्हिडिओंची चाचणी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ऑफलाइन स्रोतांवरून घेण्यात आली आहे.

‘रॅडिकल कंटेंट अ‍ॅनालायझर’ हे साधन हॅकॅथॉन-२०२४ दरम्यान विकसित करण्यात आले. २०२३ मध्ये आयोजित डीजी/आयजी परिषदेत ऑनलाइन दहशतवाद रोखण्यासाठी या साधनाच्या विकासाची शिफारस करण्यात आली होती. क्युआर कोड आधारित उपक्रमाने वाहतूक नियमांचे पालन आणि वाहनचालकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. पाद्रे कोन्सेसाओ कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम ‘हॅकेथॉन २०२४’ मध्ये तयार केला आहे.

याशिवाय गोवा पोलिसांनी अनेक इतर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर सुरू केला आहे. यामध्ये ‘सायबर योद्धा’, ‘एआय-एमएल लॅब’, ‘क्विकपास’, ‘ट्रॅक’ (ट्रॅफिक रिस्पॉन्स अँड कंजेशन कंट्रोल सेंटर), ‘स्पॉट द स्कॅम’ (फेक वेबसाइट आणि एपिके फाईल शोध), ‘भाडेकरू-नोकरीदार पडताळणी अ‍ॅप’, ‘क्लाउड बेस्ड १९३० सायबर क्राईम हेल्पलाईन सेंटर’ आणि ‘क्युआर कोड-आधारित सार्वजनिक प्रतिसाद प्रणाली’ यांचा समावेश आहे.

वाहतूक अधिकारी कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर २४ तासांसाठी वैध क्यूआर कोड तयार करतील. हा कोड एसएमएसद्वारे वाहनचालकास मिळेल.

पुढील तपासणीत जर कोणताही नियमभंग नसेल तर हा क्यूआर कोड दाखवून विनाअडथळा मार्गक्रमण करता येईल.

हेल्पलाईनसाठी ‘क्लाऊड कॉल सेंटर’

१९३० हा टोल फ्री सायबर क्राईम हेल्पलाईनसाठी एआय-एमएल लॅबखालील क्लाऊड कॉल सेंटर विकसित करण्यात येत आहे. नागरिकांकडून येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील कॉल्स हाताळणे, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि सायबर आपत्ती काळात कॉल कॉन्फरन्सिंगची सुविधा या केंद्रात उपलब्ध असेल. गोवा पोलिसांच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सुरक्षितता वाढण्यासह, नागरिकांना त्वरित आणि प्रभावी सेवा मिळेल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला जोरदार धडक, 4 मुलांसह 6 जण गंभीर जखमी

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

SCROLL FOR NEXT