Sunita Karapurkar Dainik Gomantak
गोवा

Navratri 2022 : कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनिता कारापूरकर

पोलिस खात्‍यात महिलाही चांगले काम करतात; कृतीतून केले सिद्ध!

गोमन्तक डिजिटल टीम

Navratri 2022 : गोवा-महाराष्ट्र सीमेवरील पेडणे तालुका हा 30 वर्षांपूर्वी तसा ग्रामीणच. तालुक्यातील अनेकजण हे शेती व्यवसायावरच अवलंबून असायचे. फक्त शेती हाच व्यवसाय असलेल्या कुटुंबातील पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक सुनिता कारापूरकर या गेली 33 वर्षे पोलिस खात्यात काम करत आहेत. पोलिस खात्यात सेवा बजवाताना अनेक विभागात रात्रंदिवस काम करण्याची वेळ आली. मात्र, त्यांनी प्रामाणिकपणे व कोणताही डाग खाकी वर्दीला लागू दिला नाही.

पेडण्यातील आरोबा-धारगळ अशा दुर्गम भागातून 1989 साली पोलिस खात्यात रुजू झालेल्या सुनिता कारापूरकर यांचे बालपण तसे हलाखीमध्ये गेले. कुटुंबाच्या परिस्थितीमुळे त्यांना एसएससीपर्यंत शिक्षण घेणे शक्य झाले. त्यांनी सांगितले, ‘कुटुंबाला हातभार लावण्यासाठी एका खासगी कंपनीत नोकरी पत्करली. दरम्यान, पोलिस महिला कॉन्स्टेबल्स भरतीची जाहिरात आली. इच्छा असूनही वडिलांनी नकार दिला. दुसऱ्यांदा रोजगार विनिमय केंद्रातून पोलिस भरतीसाठी कॉल आला तेव्हा मनाशी ठाम ठरवून ही संधी न सोडण्याचा निर्णय घेतला व थेट पोलिस मुख्यालयात शारीरिक चाचणीसाठी मैत्रिणीला घेऊन आले.

शेतामध्ये काम करत असल्याने शारीरिक चाचणीत पात्र झाले व त्यानंतर मुलाखत दिली. काही दिवसांनी कॉन्स्टेबलसाठी निवड झाल्याचे पत्र आले व आनंद झाला. कुटुंबात काहीसा विरोध होता. मात्र, आईवडिलांना विश्‍वास देत ही नोकरी पत्करली. वाळपईत पोलिस प्रशिक्षण घेतले. धावण्याची सवय नसल्याने पाय सुजायचे व तेव्हा वाटले होते की नोकरी सोडून द्यायची. पुन्हा मनाशी पक्के ठरवून कितीही अडचणी आल्या व त्रास झाला तरी ते सहन करायचे. पहिलीच पोस्टिंग बेती पोलिस स्थानकात झाली. त्यानंतर राजधानी पणजी, क्राईम ब्रँच, अमली पदार्थविरोधी कक्ष व आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत आहे. पणजीमध्ये अर्ध्याहून अधिक सेवाकाळ पूर्ण केला आहे.

तीस वर्षांपूर्वी अनुभवी अधिकारी मोहन नाईक, देऊ बाणावलीकर व सेराफिन डायस यांच्या हाताखाली काम करताना कशाचीच असुरक्षितता वाटली नाही. एकेकाळी विरोध करणारे आईवडील आणि सासरच्या कुटुंबालाही मी पोलिसात असल्याचा अभिमान वाटतो. अविरत सेवेसाठी खात्याकडून अनेक प्रशस्तीपत्रे मिळाली आहेत.’

महिलाही सक्षम

साधारण 30 वर्षांपूर्वी बहुतांश महिला पोलिसांत भरतीसाठी येत नव्हत्या. मात्र, पोलिस खात्यात महिलांनाही सुरक्षितता आहे. तसेच महिलाही कोणत्याही क्षेत्रात काम करू शकतात हे दाखवायचे होते. पोलिस खात्यात काम करणाऱ्या महिलांबाबत लोकांच्या मनात असलेला वाईट दृष्टिकोन पुसून टाकण्याचे ध्येय होते.

पोलिस सेवेतील कामगिरी

1989 - पोलिस कॉन्स्टेल म्हणून दाखल

2007 - पोलिस हवालदारपदी बढती

2021 - सहा. उपनिरीक्षकपदी बढती

दरम्यान आपला एक अनुभव सांगताना सुनीता म्हणतात, ड्युटी संपवून घरी गेले होते. मध्यरात्री दोन वाजता पणजी स्थानकातून फोन करून बोलावले. पणजीतील एका प्रसिद्ध हॉटेलात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार आली होती. पोलिस कर्तव्य बजावताना वरिष्ठांचा आदेश मानून तत्काळ स्थानकावर पोहोचले. या प्रकरणी गुन्हा दाखल होईपर्यंत दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस गेला. अशावेळी तुम्हाला इतर कशाचाच विचार न करता पोलिस कर्तव्य श्रेष्ठ मानून काम करावे लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT