Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: पोलिस स्थानकांत कर्मचाऱ्यांची कमतरता; 45 पोलिस स्थानकांसाठी केवळ 'एवढेच' कर्मचारी

कर्मचाऱ्यांची कमतरता ः तपासकामावर पडतोय बोजा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police पोलिस खात्यात सुमारे पाच हजाराहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या असूनही 45पोलिस स्थानकांत 2460 पोलिस कर्मचाऱ्यांची वर्णी लावली आहे. गेल्या काही वर्षांत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असले, तरी या पोलिस स्थानकांत जी दहा वर्षांपूर्वीची क्षमता आहे, त्यात बदल करण्यात आलेला नाही.

त्यामुळे पोलिस स्थानकांत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्याचा परिणाम तपासकामावर पडत आहे. म्हापसा, मडगाव, डिचोली, फोंडा व पणजी ही पाच पोलिस स्थानके वगळता इतर स्थानकांत ही संख्या 100 पेक्षा कमी आहे.

आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी राज्यातील पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांच्या संख्येसंदर्भातचा प्रश्‍न विचारला होता, त्याला गृहमंत्री प्रमोद सावंत यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे. प्रत्येक पोलिस स्थानकात प्रत्येकी एक पोलिस निरीक्षक असला तरी मडगाव महिला पोलिस स्थानक तसेच आर्थिक गुन्हे शाखेत प्रत्येकी दोन पोलिस निरीक्षक आहेत.

राजधानीतील पणजी पोलिस स्थानकात उपनिरीक्षकांची खूपच कमतरता आहे. एकूण 132 कर्मचारी आहेत, त्यामध्ये 6 उपनिरीक्षक व 6 साहाय्यक उपनिरीक्षक आहेत. पणजीत अनेक आंदोलने सुरूच असतात.

त्यामुळे त्यासाठी जादा पोलिस कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असून त्यात वाढ करण्यात आलेली नाही. एकेकाळी या पोलिस स्थानकात १० उपनिरीक्षक असायचे. मात्र, ही संख्या कमी असल्याने त्यांच्यावरील पोलिस तपासकामाचा बोजाही वाढला आहे.

वाढीव कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष

मडगाव पोलिस स्थानकात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक १४८ असली, तरी तेथे उपनिरीक्षकांची खूप कमतरता आहे. ५ उपनिरीक्षक व ६ साहाय्यक उपनिरीक्षक आहेत. पोलिस निरीक्षकांना मात्र या अधिकाऱ्यांना ड्युटी देताना तारेवरची कसरत करावी लागते.

पोलिस कर्मचारी कमी असल्याने त्यात वाढ करण्याची विनंती वरिष्ठांकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गंभीर गुन्ह्यांचा तपास निरीक्षक व उपनिरीक्षक करू शकतो. त्यामुळे तपासकामात तसेच पुरावे जमा करण्यात अनेकवेळा अडचणी येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT