Drug Seized In Mapusa Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: सनबर्न, थर्टी फर्स्टपूर्वी गोवा पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 10 लाखांचा गांजा जप्त

Drug Seized In Mapusa Goa: झारखंड येथून आलेले तीन जणांना गांजा पुढे गोव्यातील दोघांना विक्री करण्याचा त्यांचा प्लॅन होता.

Pramod Yadav

म्हापसा: राज्यात पर्यटन हंगाम तेजीत आहे. देश- विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल होत असताना अमली पदार्थ तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आले. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सनबर्न आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्यात अवैध पद्धतीने अमली पदार्थ यायला सुरुवात झालीय.

म्हापसा पोलिसांनी अमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई करत तब्बल दहा लाखांचे अमली पदार्थ जप्त करुन, पाच जणांना अटक केलीय. म्हापसा केटीसी बस स्थानक येथे पोलिसांनी गुरुवारी (१२ डिसेंबर) ही कारवाई केली.

म्हापसा पोलिसांनी चंदनकुमार मोहन मिस्त्री शर्मा (२२), रोहित रामराज विश्वकर्मा शर्मा (२१), इमतियाज मुस्लिम अन्सारी (२१) (सर्व रा. झारखंड) विजय प्रदीप वळवईकर (२५) आणि परशुराम शंकराप्पा लमाणी (३६) (दोघेही रा. कार्मुली, बार्देश) यांना अटक करण्यात आली आहे.

म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. संशयितांकडून १०.३०० किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. झारखंड येथून आलेले तीन जणांना गांजा पुढे गोव्यातील दोघांना विक्री करण्याचा त्यांचा प्लॅन होता. दरम्यान, पोलिसांनी यातील सर्व पाच जणांना अटक केलीय

राज्यात पर्यटन हंगाम तेजीत आहे, तसेच, येत्या काळात राज्यात पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत आणि सनबर्न महोत्सवाच्या दरम्यान राज्यात अमली पदार्थ तस्करीचे प्रमाण वाढण्याची भीती असते. देश -विदेशातून तस्कर यावेळी सक्रिय होतात. दरम्यान, पोलिसांनी म्हापशातून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केलाय. पण, पुढे देखील तस्करी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT