Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: चार लाखांच्या गांजासह उत्तर प्रदेशातील तरुणाला रंगेहाथ पकडले; गोवा पोलिसांची कारवाई!

Goa Police: राज्यात मागील काही दिवसांपासून गोवा पोलिसांच्या बेकायदेशीर अमली पदार्थाविरोधातील कारवाया वाढल्या आहेत.

Manish Jadhav

वेर्णा: राज्यात मागील काही दिवसांपासून गोवा पोलिसांच्या बेकायदेशीर अमली पदार्थाविरोधातील कारवाया वाढल्या आहेत. यातच आता, वेर्णा येथे गोवा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात रोहन बिंड याला 4.255 ग्रॅम गांजासह अटक केली. बाजारभावानुसार या गांजाची किंमत 4.25 लाख एवढी आहे.

भांडाफोड

मिळालेल्या माहितीनुसार, एका महत्त्वाच्या अमली पदार्थाचा भंडाफोड करताना गोवा पोलिसांनी 26 वर्षीय रोहन बिंड याच्या मुसक्या आवळल्या. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. 4.25 लाख किमतीचा 4.255 किलोग्राम गांजा रोहनकडून जप्त करण्यात आला. ही घटना 30 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 4:43 ते संध्याकाळी 6:45 दरम्यान वेर्णा येथील मोकळ्या मैदानात घडली.

पीएसआय निखिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रहिवासी असलेल्या रोहनला रंगेहाथ पकडण्यात आले. रोहनविरोधात NDPS कायद्याच्या कलम 20(b)(ii)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

ड्रग्ज तस्कर ताब्यात

काही दिवसांपूर्वी, हरमलमध्ये टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ड्रग्स तस्करांना अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हरमलमध्ये टाकलेल्या धडीत दत्ता नाथ (57, नेपाळ) याला 930 ग्रॅम चरस गोवा पोलिसांनी (Goa Police) अटक केली होती. जवळपास 3.72 लाख किमतीचे चरस असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT