पणजी: गळफास लावून जीवन संपवण्याच्या मार्गावर असलेल्या एका व्यक्तीला जीव गमावण्यापासून परावृत्त करत जीवनदान देण्यात गोवा पोलीस यशस्वी ठरले आहेत. पणजी येथील सांताक्रुज या भागात राहणाऱ्या एका इसमाने कौटुंबिक वादाच्या तणावाने हताश होऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र पोलीस वेळीच दाखल झाल्याने त्याचा जीव वाचला.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार सांताक्रुज, पणजी येथील मंदिरच्या परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीला जीव देण्यापासून अडवण्यात पोलिसांना यश आले. रविवार (दि. २७) रोजी एक माणूस गळफास घेऊन जीव गमावण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जुने गोवे पोलिसांनी केवळ १२ मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचत व्यक्तीला जीव गमावण्यापासून परावृत्त केले तसेच त्याला सुरक्षित बाहेर काढले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमधून हा व्यक्ती पत्नी आणि मुलीपासून विभक्त राहत असल्याची माहिती मिळाली आणि यामुळेच तो मानसिक तणावाखाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हाच मानसिक तणाव सहन न झाल्याने सांताक्रुज येथील या व्यक्तीने टोकाची भूमिका घेतली असल्याची शक्यता वर्तवली जातेय. सध्या न्यायालयीन आदेशानुसार त्याला मानसिक उपचारांसाठी बांबोळी येथील मानसोपचार व मानसिक आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी गोवा आरोग्य विभाग आणि राज्यातील इतर प्राथमिक केंद्रांनी केलेल्या परीक्षणातून राज्यात हा पुरुषांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली होती. नैराश्यात जगत असलेल्या महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा जवळपास १०० टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती उघड झाली. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन करण्यासाठी आलेल्या ५४० रुग्णांपैकी ३७१ या महिला रुग्ण असून त्यांचे वयोमान ४५ ते ५४ च्या आसपास होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.