पणजी: गोवा पोलिसांच्या (Goa Police) गुन्हे शाखेने सखोल तपास केल्यानंतर मोपा येथील चंद्रकांत बांदेकर हत्या प्रकरणी अहमदाबाद-गुजरात येथून आरोपी जयपुरी गोसाई याला अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. जून 2021 मध्ये गोवा येथे तो आला होता. जेव्हा त्याच्याकडे पैसे संपले तेव्हा त्याने अहमदाबादला परतण्याचा निर्णय घेतला आणि परत जात असताना त्याने पत्रादेवी येथे अनोळखी दुचाकीकडे लिफ्ट मागितली होती. त्याची सोनसाखळी पाहून त्याला लुटण्याचा मोह झाला आणि तो लुटण्यासाठी त्याने आरोपीला भोसकले आणि त्याच्या मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेला.
सुरुवातीला तपासादरम्यान प्रकरणात कोणतेच धागेदोरे नव्हते तरी सीसीटीव्ही फुटेजचा एकमेव पुरावा होता तो म्हणजे मयत व्यक्तीने अनोळखी व्यक्तीला ॲक्टीव्हा वावर लिफ्ट दिली हे स्पष्ट झाले होते.
पोलिसांनी सुगावा शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यासाठी आणि संशयास्पद व्यक्तींची चौकशी करण्यासाठी अनेक पथके तयार केली. तांत्रिक आणि मानवी बुद्धिमत्तेच्या सखोल विश्लेषणानंतर, महाराष्ट्रातील अमरावती येथे एक संशयित सापडला. पोलिस निरीक्षक राहुल परब आणि लक्षीआमोणकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर गोवा आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकांद्वारे ताबडतोब आंतरराज्य ऑपरेशन सुरू करण्यात आले.
अखेरीस, या आंतरराज्य ऑपरेशनात यश येऊन जयपुरी गोसाई म्हणून ओळखला जाणारा मुख्य आरोपी गुजरातच्या अहमदाबादमध्ये पकडला गेला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.