Goa Police News:  Dainik Gomantak
गोवा

Goa Police News: अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपातून इस्रायली नागरिकाची निर्दोष मुक्तता; 7 पोलिसांवर आरोप निश्चित

माजी पोलिस उपअधीक्षकाचाही समावेश

Akshay Nirmale

Goa Police News: गोव्यातील एका न्यायालयाने माजी पोलिस उपअधीक्षकासह सात पोलिसांवर आरोप निश्चित केले आहेत. या सात पोलिसांनी 2010 मध्ये इस्त्रायली नागरिकावर ड्रग्ज बाळगल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी गेल्या आठवड्यात तत्कालीन पोलिस उपअधीक्षक नरेश महामल, तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सुनील गुडलर आणि अन्य पाच पोलिसांवर आरोप निश्चित केले. त्याच वेळी, न्यायालयाने ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपातून इस्त्रायली नागरिकाची निर्दोष मुक्तता केली.

हे प्रकरण 2010 चे असून गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलचे आहे. ड्रेहम या इस्त्रायली नागरीकाला एक्स्टसी, हेरॉईन, कोकेन, एलएसडी आणि चरस यासह अनेक प्रतिबंधित ड्रग्स ताब्यात असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या अमली पदार्थांची एकूण किंमत 3.81 लाख रुपये होती.

ड्रेहमची बहीण आयला हिने छुपे कॅमेरे वापरून खुलासा केला होता की गोवा पोलिस कर्मचाऱ्यांनी तिच्या भावाविरुद्ध खोटे पुरावे पेरले होते आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

नंतर हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे सोपवण्यात आले. त्यांनी ड्रेहमवर ड्रग्ज बाळगल्याचा आरोप चुकीचा असल्याचे सांगत 2012 मध्ये सात पोलिसांना अटक केली होती.

सीबीआय तपासात अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. त्यात ड्रेहम याला धमकावून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती होती. ड्रेहम आता या प्रकरणात दोषी आढळलेला नाही. गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी त्याची निर्दोष मुक्तता केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT