Goa police app Dainik Gomantak
गोवा

Goa Police App: गोवा पोलिस आता ‘स्‍मार्ट’ मोबाईलवर! सूचना, सायबर सुरक्षिततेसंबंधी माहिती मिळणार तात्काळ

Goa Police Mobile App: नागरिक आता आधार, पॅन किंवा वाहनचालक परवाना क्रमांकाद्वारे भाडेकरूंची पडताळणी ऑनलाईन करू शकतात. प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात जाण्याची गरज उरत नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा पोलिस दलाने आधुनिक आणि नागरिकाभिमुख सेवेसाठी मोठे पाऊल टाकत दोन अत्याधुनिक डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल शनिवारी ‘गोवा पोलिस मोबाईल अ‍ॅप’ आणि ‘क्लाऊड-आधारित १९३० सायबर हेल्पलाईन सेंटर’चा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. हे दोन्ही उपक्रम ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘स्मार्ट पोलिसिंग’ या राष्ट्रीय संकल्पनेशी सुसंगत असून नागरिकांसाठी पोलिस सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम आणि प्रतिसादक्षम करण्याचा उद्देश असल्याचे विभागाने स्पष्ट केले.

गोवा पोलिस मोबाईल अ‍ॅप’ हे नागरिक आणि पोलिसांच्या विविध सेवांना एकत्र आणणारे सर्वसमावेशक डिजिटल व्यासपीठ आहे. यामध्ये नागरिक आता आधार, पॅन किंवा वाहनचालक परवाना क्रमांकाद्वारे भाडेकरूंची पडताळणी ऑनलाईन करू शकतात. प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात जाण्याची गरज उरत नाही. या सेवेसाठी शासननिर्धारित केवळ ८४ रुपयांचे नाममात्र शुल्क आहे.

वापरकर्त्यांना वाहतूक सल्ले, पोलिसांच्या महत्त्वाच्या सूचना आणि सायबर सुरक्षिततेसंबंधी माहिती मोबाईलवर तत्काळ मिळेल. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष ऑडिओ-व्हिडिओ संवाद साधण्याची सुविधाही या ॲपमध्ये उपलब्ध आहे. कर्मचारी पडताळणी आणि महिलांसाठी विशेष एसओएस सुविधा लवकरच सुरू होणार आहेत. हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत डाऊनलोड करता येईल.

स्वदेशी पद्धतीने प्रणाली निर्मिती

कॉल कॉन्फरन्सिंग, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत थेट संपर्क आणि स्मार्ट कॉल राऊटिंगमुळे पीडितांना त्वरित मदत मिळते. सर्व कॉल्स रेकॉर्ड केल्यामुळे तपास आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी ते उपयुक्त ठरतात. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रणाली गोवा पोलिसांच्या एआय-एमएल लॅबमध्ये स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आली आहे.

सायबर गुन्ह्यांना तत्काळ प्रतिसाद

सायबर गुन्ह्यांना प्रतिसाद अधिक परिणामकारक करण्यासाठी गोवा पोलिसांनी राष्ट्रीय हेल्पलाईन ‘१९३०’ला क्लाऊड-आधारित अत्याधुनिक कॉल सेंटरमध्ये रूपांतरित केले आहे. या प्रणालीमुळे कॉल ड्रॉप्स टळतात आणि सेवा अखंड सुरू राहते. एआय प्रणालीद्वारे तक्रारींचे विश्लेषण करून जलद प्रतिसाद मिळतो तसेच नवीन सायबर गुन्ह्यांच्या पद्धतींचा मागोवा घेता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखी एका मुस्लीमबहुल देशात सत्तापालट! लष्कराने घेतला संसदेचा ताबा, राष्ट्रपतींना ठोकल्या बेड्या; 'हा' वाद ठरला कारण VIDEO

Temba Bavuma Record: टेम्बा बावुमाने रचला इतिहास! टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला 'हा' जागतिक रेकॉर्ड; बेन स्टोक्स आणि लिंडसे हॅसेटला सोडले मागे

'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीची गोव्यात एन्ट्री! CM सावंतांनी केले कौतुक म्हणाले,'संस्कृतीचा सन्मान करणारे आणखी चित्रपट बनवा'

Imran Khan: इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? भेटायला गेलेल्या बहिणींना पोलिसांकडून धक्काबुक्की; पाकिस्तानात तणाव

Goa Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पाचा पेच सर्वोच्च न्यायालयात, 'आदेश सर्वांना बंधनकारक'; वनमंत्री राणेंची माहिती

SCROLL FOR NEXT