Goa Police Checking Dainik Gomantak
गोवा

Goa Police : तळीरामांना दणका; अपघात रोखण्यासाठी गोव्यात यंत्रणा सक्रिय

रात्रीही वाहतूक पोलिसांकडून विविध ठिकाणी कडक तपासणी मोहीम

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी वाहतूक पोलिसही सक्रिय झाले आहेत. मंगळवारी रात्री राज्यात दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येकी पाच ठिकाणी एकाच वेळी पोलिसांनी वाहनचालकांची अल्कोमीटरच्या सहाय्याने मद्यप्राशन केले आहे की नाही याची कडक तपासणी सुरू केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरात झालेल्या अपघातांमध्ये वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याची शंका आहे. त्या अनुषंगाने ही मोहीम सक्रियपणे राबवली जात आहे. यासाठीच या संदर्भातील कायद्यातील बदल जाहीर केला असून यापुढे मद्यप्राशन करून गाडी चालविल्यास आणि तो दोषी आढळल्यास सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. सध्या सापडणाऱ्या संशयितांची वैद्यकीय चाचणीही घेण्यात येईल. शिवाय त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात येईल.

अल्कोमीटरच्या चाचणीत सापडलेल्या अनेक वाहनचालकांचे वाहन परवाने आणि इतर तपशीलवार माहिती नोंद करून त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर उभे केले जाईल. या दरम्यानच वाहन चालनाविषयी हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, परवाना नसणे यासारख्या अन्य वाहतूक नियमांची कसून चौकशी सुरू होती. काही बेशिस्त वाहनचालकांना घटनास्थळीच दंडाचे चलन देण्यात आले.

मद्यप्राशन केलेले रस्त्यावर आलेच नाहीत

पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे या मोहिमेची राज्यात संध्याकाळपासूनच चर्चा सुरू झाली होती. या कारवाईचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने अनेक मद्यपींनी वाहन चालवणे टाळले. शिवाय अनेक जण कारवाईच्या धास्तीने आहे तिथेच थांबून राहिल्याची माहिती मिळाली.

हजारो वाहनांची तपासणी
राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी हजारो वाहनांची तपासणी केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू असल्याने निश्‍चित किती जणांवर कारवाई झाली याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, ही संख्या शेकडोंच्या घरात असू शकते अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

आठवड्याभरातील मृत्यू
तारीख - स्थळ - बळी
24 जुलै - अटल सेतू - 1
28 जुलै - झुआरी पूल - 4
30 जुलै - धारगळ - 1
2 ऑगस्ट - नावेली - 2

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT