Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: 'वार्का'त फ्लॅटवर छापेमारी! 2 लाखांच्या ड्रग्जसह दोघे ताब्यात; गोवा पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

Colva police drug raid Varca: गोव्यातील पर्यटन स्थळांच्या परिसरात अमली पदार्थांविरुद्ध पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली असून, कोलवा पोलिसांनी वार्का येथील एका फ्लॅटवर छापा टाकून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला.

Sameer Amunekar

मडगाव: गोव्यातील पर्यटन स्थळांच्या परिसरात अमली पदार्थांविरुद्ध पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली असून, कोलवा पोलिसांनी वार्का (Varca) येथील एका फ्लॅटवर छापा टाकून मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एमडीएमए (MDMA) आणि चरस असा एकूण २ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त केला आहे.

आरोपींच्या मुसक्या आवळल्या

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कोलवा पोलिसांनी वार्का येथील एका संशयास्पद फ्लॅटवर अचानक धाड टाकली. या छाप्यात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले.

पहिल्या कारवाईत आकाश सजित नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडे १,३५,८०० रुपये किमतीचे ६.७९ ग्रॅम एमडीएमए आणि २४,३०० रुपये किमतीचे २.४३ ग्रॅम चरस सापडले. पोलिसांनी या सर्व वस्तू तातडीने जप्त केल्या आहेत.

त्याच छाप्यात पोलिसांनी दुसरी कारवाई करत प्रतीक बसमन यालाही अटक केली. त्याच्या झडतीदरम्यान ४०,४०० रुपये किमतीचे २.०२ ग्रॅम एमडीएमए हस्तगत करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या या सर्व अमली पदार्थांची एकूण बाजारपेठ किंमत २,००,५०० रुपये इतकी आहे. एकाच ठिकाणाहून दोन जणांना अशा प्रकारे मोठ्या साठ्यासह पकडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस तपास सुरू

अटक करण्यात आलेले हे तरुण हे ड्रग्ज कोठून आणत होते आणि ते कोणाला विकणार होते, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराज्यीय ड्रग्ज नेटवर्कशी जोडलेले आहेत का, यादृष्टीने सखोल तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT