Goa Police |  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: वाहतुकीवर पाळत ठेवण्यासाठी गोवा पोलिसांचे मोठे पाऊल

राज्यात होत असलेल्या अपघातांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून बेशिस्त वाहन चालकांविरोधात मोहीम सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Police: राज्यात होत असलेल्या अपघातांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून बेशिस्त वाहन चालकांविरोधात मोहीम सुरू केली आहे. गत दहा दिवसांत उत्तर गोव्यात 3522 बेशिस्त चालकांविरुद्ध दंडाची कारवाई केली आहे.

तर यापुढे वाहतूक व गर्दी व्यवस्थापन तसेच पाळत ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जाणार आहे. याकरिता तीन ड्रोन सरकारने मंजूर केले आहेत. पुढील दीड महिन्यात ते उपलब्ध होतील.

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन म्हणाले की, पोलिसांनी महत्त्वांच्या पुलावर तसेच अधिक वर्दळ असलेल्या ठिकाणी सीट बेल्ट, हेल्मेट न वापरणे तसेच वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. कर्कश आवाजाचे हॉर्न लावणाऱ्यांची वाहने ताब्यात घेऊन नव्या नियमानुसार कारवाई केली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई हाच उपाय आहे. गेल्या काही दिवसांत घडलेले अपघात मानवी चुकीमुळे तसेच ओव्हरटेक करताना झाले आहेत.

अनेक दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करत नसल्याने त्या परिसरातील पोलिस स्थानकांना कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हापसा, कोलवाळ, साळीगाव व डिचोली या भागात 300हून अधिक जणांविरुद्ध कारवाई झाली आहे. - निधीन वाल्सन, पोलिस अधीक्षक, उत्तर गोवा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Supermoon 2025: आकाशातील अद्भुत क्षण! आज गोव्यातून दिसणार 'सुपरमून', कुठे किती वाजता पाहता येईल?

Punav Utsav: देव भगवतीच्या चव्हाट्यावर येतात, मंगलाष्टके म्हणून ‘शिवलग्न’ लावले जाते; पेडणेची प्रसिद्ध 'पुनाव'

Goa Agriculture: 'थोडा अभ्यास वाढवला, सरकारने सहकार्य केले तर गोव्यात मुबलक भाजीपाला पिकेल'; कृषी राजदूत 'वरद'चे प्रतिपादन

Punav Utsav: ‘एका रातीन आनी एका वातीन, माका देऊळ बांधून जाय’! शेकडो वर्षांची परंपरा असलेली पेडण्याची 'पुनाव'

Supreme Court On Cricket: 'क्रिकेट' आता खेळ नाही, केवळ व्यवसाय! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT