Goa Police  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 32 पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या

पणजीत सुदेश नाईकांची नियुक्ती तर वादग्रस्त अधिकारी एकोस्कर मात्र पदभाराविना

दैनिक गोमन्तक

पणजी : पोलिस खात्याने 32 अधीक्षकांच्या बदल्यांचा आदेश आज बुधवारी जारी केला. प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 17 उपअधीक्षकांना पाच महिन्यांनंतर पदभार मिळाला आहे. पणजीच्या उपविभागीय पोलिस अधिकारीपदी सुदेश नाईक यांची वर्णी लावण्यात आली आहे. तर उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्याकडे म्हापसा उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा ताबा देण्यात आला आहे. बढती मिळालेले व वादग्रस्त ठरलेले उपअधीक्षक सागर एकोस्कर यांना मात्र पदभार देण्यात आलेला नाही. (Goa Police Department Transfers)

उपअधीक्षक उदय परब यांची गोवा राखीव पोलिस दलात, राजेश कुमार वास्को उपविभागीय पोलिस अधिकारीपदी, नीलेश राणे यांची विभागीय केपे अधिकारीपदी, नूतन वेर्णेकर यांची विदेशगमन क्षेत्रीय विभागात, मारिया मोन्सेरात यांची महिला पोलिस स्थानक व पोलिस निवडणूक कक्ष, नेर्लोन अल्बुकर्क यांची अमली पदार्थविरोधी कक्ष, संदेश चोडणकर यांची काणकोण उपविभागीय पोलिस अधिकारी, ब्राझ मिनेझिस यांची उत्तर गोवा मुख्यालय, सूरज हळर्णकर यांची क्राईम ब्रँचमध्ये, शिवेंदू भूषण यांची मडगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी, फ्रांसिस्को कॉर्त यांची आर्थिक गुन्हे कक्ष, राजन निगळ्ये यांची अतिरेकीविरोधी विभाग, विल्सन डिसोझा यांची पोलिस मोटार वाहन कक्ष, रूपेंद्र शेटगावकर यांची गोवा राखीव पोलिस दल, गुरुदास कदम यांची कोकण रेल्वे पोलिस विभागात बदली करण्यात आली आहे.

तुषार वेर्णेकर यांची मुख्यमंत्री सुरक्षा विभाग, मनोज म्हार्दोळकर यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र, राजेंद्र प्रभुदेसाई यांची दक्षिण गोवा पोलिस मुख्यालय, रॉय परेरा यांची पोलिस नियंत्रण कक्ष, हरिष मडकईकर यांची पणजी पोलिस मुख्यालयात (प्रशासन), आशिष शिरोडकर यांची वाहतूक पोलिस मुख्यालय, एडविन कुलासो यांची गोवा राखीव पोलिस दल, शिवराम वायंगणकर यांची दक्षिण विशेष शाखा, संतोष देसाई यांची किनारपट्टी सुरक्षा विभाग, प्रवीण वस्त यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

सलीम शेख यांची उत्तर जिल्हा विशेष विभाग, एझिल्डा डिसोझा यांची कायदा व दक्षता विभाग, राम आसरे यांची पोलिस नियंत्रण व बिनतारी संदेश कक्ष तर सुदेश नार्वेकर यांची आयआरबी उपकमांडंट म्हणून बदली करण्यात आली आहे.

वेतनाचाही प्रश्‍न सुटला : पाच महिन्यांपूर्वी पोलिस खात्यातील २५ निरीक्षकांना उपअधीक्षकपदी बढती देण्यात आली होती. निवडणुकीपूर्वी त्यातील ७ जणांनाच पदभार मिळाला होता. तर उर्वरित पदभारच्या प्रतिक्षेत होते. पदभार नसल्याने त्यांच्या वेतनाचाही प्रश्‍न उपस्थित झाला होता. गेले पाच महिने त्यांना बढतीनुसार वेतनही मिळालेले नव्हते. त्यामुळे सरकारला अखेर बदल्यांचा आदेश काढून सगळ्यांना पदभार द्यावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 5th T20: मालिकेचा फैसला अहमदाबादमध्ये! पाचव्या टी-20 सामन्यावर हवामानाचं सावट की पावसाची खेळी? जाणून घ्या खेळपट्टी आणि वेदर रिपोर्ट

हडफडे अग्नितांडव प्रकरण! 'बर्च बाय रोमिओ लेन'च्या मालकांचे धाबे दणाणले; अजय गुप्ताची जामिनासाठी कोर्टात धाव

Goa Raj Bhavan Name Change: गोव्यात ऐतिहासिक निर्णय! 'राजभवन' आता ओळखले जाणार 'लोकभवन' नावाने; राज्यपालांनी पुसली वसाहतवादी ओळख

Cyber Fraud: 'अनन्या'च्या जाळ्यात अडकला एसबीआय क्लर्क, फेसबुकवरची एक फ्रेंड रिक्वेस्ट अन् 92 लाखांचा गंडा; काय नेमकं प्रकरण?

बेतुल ONGC परिसरात अग्नितांडव! वेल्डिंगच्या ठिणगीमुळे भीषण आग; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT