Goa Police
Goa Police  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 23 पोलिस उपनिरीक्षकांना निरीक्षकपदी बढती

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा पोलीस दलात बदल्यांचं सत्र अजूनही सुरुच आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यापासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आता पोलिस खात्यातील 23 उपनिरीक्षकांच्या बढत्यांचा आदेश आज पोलिस महासंचालनालयाने शुक्रवारी काढला आहे.

या आदेशानुसार अमरनाथ पास्सी (कोकण रेल्वे पोलिस स्टेशन), पुष्पलता पी. बोरकर (एएचटीयू मडगाव), अरुण बाक्रे (पीटीएस वाळपई), चेतन सुर्लकर (ट्रॅफिक सेल पणजी), योगेश एस. सावंत (एसबी पणजी), साजिथ पिल्लई (फोंडा पोलिस स्टेशन), किशोर पी. रामानन (कळंगुट पोलिस स्टेशन), अरूण गावस देसाई (एएनसी पीएस), मेलितो फर्नांडिस (फातोर्डा पोलिस स्टेशन), देवेंद्र विठाबा पिंगळे (सायबर क्राईम पोलिस स्टेशन), संजित बी. कांदोळकर (शिवोली किनारा पोलिस स्टेशन) अशा बढत्या देण्यात आल्या आहेत.

यासोबतच नवीन पी. देसाई (पेडणे पोलिस स्टेशन), सुजय एस. कोरगावकर (आगसी पोलिस स्टेशन), राहुल शांताराम नाईक (कुंकळ्ळी पोलिस स्टेशन), गौरेश जी. मळीक (जुने गोवा पोलिस स्टेशन), अलवितो फ्रान्सिस्को (मडगाव टाऊन पोलिस स्टेशन), मार्लोन ए. जे. लुईस डिसोझा (क्राईम ब्रँच रायबंदर), रिमा आनंद नाईक (कळंगुट पोलिस स्टेशन), नाथन आल्मेदा (एफआरआरओ पणजी), त्याशिवाय विलेश दुर्भाटकर (एटीएस पणजी), सुशांत गावस (एसीसीआर, पणजी), वैभव डी. नाईक (कुडचडे पोलिस स्टेशन), राहुल धामशेकर (ट्रॅफिक सेल, दाबोळी विमानतळ) येथे बढती देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT