Sagar Ekoskar Dainik Gomantak
गोवा

Goa Police Controversy : वादग्रस्त पोलीस अधिकारी एकोस्कर यांच्या विरोधातील तक्रार आता महासंचालकांच्या कोर्टात

सागर एकोस्कर यांच्यासह अन्य एका पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध फ्लोयड कुतिन्हो यांनी केलेल्या तक्रारीची पंतप्रधान कार्यालाकडून दखल

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police Controversy : आपल्या विरोधात कुठ्ल्याही न्यायालयाचे वॉरंट जारी नसताना ते असल्याची खोटी माहिती केंद्र सरकारच्या आयबी विभागाला देऊन आपल्या विरोधात मुद्दामहून लूक आऊट नोटीस जारी करण्यास भाग पाडले आसा आरोप करून मडगाव येथील व्यावसायिक फ्लोयड कुतीन्हो यांनी दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया आणि उपअधिक्षक सागर एकोस्कर यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची दखल पंतप्रधान तसेच राष्ट्रपती कार्यालयाने घेतली असून त्यासंबंधी चौकशी करावी अशी सूचना गोवा सरकारच्या मुख्य सचिवांच्या कार्यालयाला केली आहे. त्यामुळे गृह खात्याने या तक्रारी पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्याकडे वर्ग केल्या आहेत.

पंतप्रधान राष्ट्रपती कार्यालयातून आलेल्या या पत्राची दखल घेत व सरकारच्या गृह खात्याचे अवलसचिव विवेक नाईक यांनी पोलीस महासंचालक महासंचालक जसपाल सिंग यांना १४ नोव्हेंबर रोजी पाठविलेल्या पत्रात तक्रारीची दखल घेऊन पुढील कारवाई करण्याची सूचना केली आहे. आणि त्यासंबंधी केलेल्या कारवाईचे माहिती मुख्य सचिवांच्या कार्यालयाला देण्यात यावी असे म्हटले आहे. पंतप्रधान कार्यालयाचे विभागीय अधिकारी विवेक प्रसाद यांनी यापूर्वी मुख्य सचिव कार्यालयाला हे पत्र पाठविले होते.

कुतिन्हो यांच्या विरोधात मायणा कुडतरी पोलिस स्थानकात एक प्रकरण नोंद झालेले असून या प्रकरणी त्याच्या विरोधात ही लूक आऊट नोटीस जारी केली आहे. भारतातील कुठ्ल्याही विमानतळावर कुतीन्हो उतरल्यास त्यांना तात्काळ अटक होऊ शकते. त्यामुळे सध्या कुतीन्हो हे मागचे वर्षभर इंग्लंड मध्ये अडकले असून आपल्या विरोधात जारी केलेली लुक आऊट नोटीस मागे घ्यावी अशी विनंती त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती.

कुतिन्हो यांनी या पत्रात केलेल्या दाव्याप्रमाणे पोलीस ज्या प्रकरणात आपल्याला अडकवू पाहतात त्या प्रकरणात आपण आरोपी नसून साक्षीदार आहे. असे असतानाही त्या पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि आताचे उपअधीक्षक सागर एकोस्कर यांनी आपल्याला या प्रकरणात विनाकारण गोवण्याच्या इराद्याने पोलीस अधीक्षक धानिया यांना आपल्या विरोधात न्यायालयाचे वॉरंट असल्याची खोटी माहिती देऊन आयबीला पत्र लिहिण्यास भाग पाडले. धानिया यांनीही कुठलीही शहानिशा न करता हे पत्र लिहिले आणि त्यामुळे आपल्या विरोधात ही लूक आऊट नोटीस जारी केली गेली असे म्हटले आहे. आपल्याला त्रास करण्यासाठी हे सर्व करण्यात आल्याचे या पत्रात कुतिन्हो यांनी म्हटले आहे. कुतिन्हो यांनी एसपीसीएकडेही सागर एकोस्कर आणि इतर पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली असून या तक्रारीवर सध्या सुनावणी चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT