Goa Police Dainik Gomantak
गोवा

'चोरीसाठी गोव्यात पाठवले, हिस्सा देण्याचे डील'; चोरट्याशी लागेबांधे असलेला 'तो' पोलीस कॉन्स्टेबल बडतर्फ

चोरटा फैझान विरोधात विविध पोलीस स्थानकांत 10 सोनसाखळ्या चोरीसह एकूण 14 गुन्हे नोंद आहेत.

Pramod Yadav

Goa Police: अट्टल चोरटा फैझान शहाजहान सय्यद या चोरट्याशी लागेबांधे असल्याप्रकरणी गोवा पोलीस कॉन्स्टेबल विकास कौशिक याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. चोरटा फैझान सय्यद याच्यावर विविध पोलीस स्थानकांत 10 सोनसाखळ्या चोरीसह एकूण 14 गुन्हे नोंद आहेत.

कॉन्स्टेबल कौशिक यानेच गोव्यात चोरी करण्यासाठी पाठवले आणि त्यात हिस्सा देण्याची डील केले. अशी कबुली फैझानने दिल्यानंतर कौशिकला निलंबित करण्यात आले होते.

मूळ कर्नाटकातील संकेश्वर, बेळगाव येथील राहणारा फैझान सय्यद (वय 24) पाजीफोंड, मडगाव येथे वास्तव्यास होता. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (रासुका) कारवाई करावी, अशी मागणी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केली आहे.

फैझान विरोधात विविध पोलीस स्थानकांत 10 सोनसाखळ्या चोरीसह एकूण 14 गुन्हे नोंद आहेत. राष्ट्रीय सुरक्षा कायदा 1980 च्या कलम 3 (2) नुसार जास्तीत जास्त कारवाई करावी, असे अधीक्षक धानिया यांनी अहवालात नमूद केले आहे.

फैझान विरोधात मायणा कुडतरी सांगे, कुडचडे, डिचोली, मडगाव, आगशी व फातोर्डा या पोलीस स्थानकांत चोरीचे गुन्हे नोंद आहेत.

डिचोली परिसरात सरकारी कर्मचार्‍याला मारहाण केल्याचा गुन्हा त्याच्याविरोधात नोंद आहे. याशिवाय फसवणूक आणि अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी देखील त्याच्याविरोधात गुन्हे नोंद आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

देशवासीयांनो आता फक्त 'स्वदेशी' वापरा, वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

"बँका कर्ज देत नसल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा", CM सावंतांचे शेतकऱ्यांना आवाहन

Quepem: बारा लाखांचे दागिने पळविले; पण गुन्‍हाच नोंद नाही! FIR नोंदवायचा नसल्याच्या तक्रारदाराच्या सबबीची केपे पोलिसांकडून ढाल

Goa Accident: वेळगे-सत्तरीत भटक्या गुरांमुळे दुचाकीचा अपघात, एक जखमी

'त्या' ग्रामसेवकावर कारवाई अटळ, पंचायत सचिव बनणे भोवले; उद्या निलंबन आदेश शक्य

SCROLL FOR NEXT