Calangute Dainik Gomantak
गोवा

Calangute: कळंगुटमध्ये अवैध मसाज पार्लर; पोलिसांच्या पडताळणी मोहिमेनंतर स्पा विरोधात अहवाल सादर

गुन्हे शाखा अधिकाऱ्यांनी गुरूवारी दुपारी कळंगुट येथील भागातील स्पा आणि मसाज पार्लर यांची पडताळणी केली.

Pramod Yadav

गुन्हे शाखा पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या वतीने कळंगुट भागात कार्यरत असलेल्या अवैध स्पा आणि मसाज पार्लर विरोधात कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आज विशेष मोहिमेंतर्गत परिसरातील विविध स्पा आणि पार्लर यांना भेट देत त्यांच्याकडे आरोग्य खात्याचा परवाना आहे का? याची पडताळणी केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा अधिकाऱ्यांनी गुरूवारी दुपारी कळंगुट येथील भागातील स्पा आणि मसाज पार्लर यांची पाहणी केली. तपासणी दरम्यान, पोलिसांनी एकूण 14 मसाज पार्लरची पाहणी केली.

यामध्ये ब्ल्यु तेरा स्पा आणि सलोन या पार्लरकडे आरोग्य खात्याचा वैध परवाना नसल्याचे पोलिसांना अडळून आले. पोलिसांनी स्पा विरोधात अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. पोलिसांनी 29A प्रमाणे स्पा विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

कळंगुटमध्ये सलूनच्या नावाखाली बेकायदेशीर मसाज पार्लर

कळंगुटमध्ये सलूनच्या नावाखाली बेकायदेशीर मसाज पार्लर चालवले जात असल्याचे दिसून आले. पोलिसांना याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी भेट देत पोलिसांनी सलून सील केले आहे.

एका भाड्याच्या रूममध्ये सलून टाकण्यात आले होते, मात्र, त्यानंतर आतमध्ये रूम्स तयार करण्यात आल्या. संशय आल्याने मालकांनी याबाबत तक्रार केली.

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

Goa Weather: 'काळजी घ्या'! पारा पोचला 34.8 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

Quepem: '..अंधाराची खंत तू कशाला करिसी रे'! अंथरुणाला खिळलेल्या 75 वर्षाच्या व्यक्तीचे घर कोसळले, श्रमधाममधून 15 दिवसात पुनर्बांधणी

Tiger Reserve Goa: व्याघ्र प्राधिकरणाच्या शिफारशींकडे कानाडोळा! जैविक संपदेच्या अस्तित्वाला धोका; ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

SCROLL FOR NEXT