Fake Call Centre In Goa Dainik Gomantak
गोवा

Fake Call Centre In Goa: सांतिनेजमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

दैनिक गोमन्तक

Goa Police Bust Fake Call Centre Duping US Citizens: सांतिनेज येथील सिल्विया हाईट्स इमारतीमधील बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पणजी पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा टाकून पर्दाफाश केला.

या कारवाईत १३ परप्रांतीयांना अटक केली असून सुमारे २६.४३ लाखांचे साहित्य जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली. या वर्षातील बनावट कॉल सेंटरविरुद्धची ही चौथी कारवाई आहे. या सेंटरचा मुख्य सूत्रधार प्रिथुश प्रजापती असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये तपन शहा (४२, गुजरात), जयमीन मिश्री (२७, गुजरात), मिलिंद कँधी (३१, गुजरात), विशाल आयामभाय (२०, गुजरात), संदीप रंगार (२४, उत्तराखंड), प्रियांक शक्या (३०, उत्तराखंड), कुणाल चौहान (२०, महाराष्ट्र), लेम्सेपी संगता (२७, नागालँड), ॲलन मॅथ्यू (२५, महाराष्ट्र), राजीव राणा (२३, नागालॅण्ड), रिजू बर्मन (२५, नागालॅण्ड), डेव्ह शिवम (२७, गुजरात), कबीर खालसा (३२, गुजरात) यांचा समावेश आहे.

हे सर्वजण या बनावट कॉल सेंटरवर अमेरिकन नागरिकांना फोन करून त्यांच्या लॅपटॉपच्या समस्या सोडवण्याच्या बहाण्याने त्यांच्या बँक अकाऊंट्सची माहिती मिळवून ती मुख्य सूत्रधार प्रिथुश प्रजापती याला पाठवत होते.

तो त्यांच्या खात्यामधील रक्कम लंपास करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी आतापर्यंत कितीजणांना गंडा घातला, याची माहिती सायबर कक्षाच्या विभागाच्या मदतीने मिळवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोडस ऑपरेंडी अशी...

  • संशयित या सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना फोन करत.

  • मायक्रोसॉफ्ट कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून त्यांच्या संगणक किंवा लॅपटॉपला व्हायरस लागला असल्यास त्याचे निवारण करण्यासाठी मदत करू, असे सांगत.

  • अमेरिकन नागरिकांनी लॅपटॉप, संगणक तसेच टॅबलेट यावर नोंद असलेला मोबाईल क्रमांक दिल्यावर हे संशयित एक्सलाईट ॲप किंवा मायक्रोसिप किंवा पिंगमे ॲपच्या मदतीने मोबाईलवर सर्व माहिती काढून घेत.

  • त्यामुळे ते ग्राहकाच्या मोबाईलवर पूर्णत: नियंत्रण मिळवत.

  • त्यांना अल्पेमिक्स २ किंवा अल्ट्रा व्हिवर ॲप इन्स्टॉल करण्यास लावून अँटी व्हायरससाठी शुल्क पाठवण्यास सांगत.

  • ग्राहकांना ॲमेझॉन, गुगल, ॲपल व टार्गेट याची गिफ्ट कार्डसने खरेदी करण्यासाठी ५०० डॉलर्सचे शुल्क आकारले जात होते.

  • ग्राहकांनी ही गिफ्ट कार्डस् खरेदी केलेल्याचा क्रमांक मिळवून त्याची माहिती हे संशयित मुख्य सूत्रधार प्रिथुश प्रजापती याला पाठवत होते.

२६.४३ लाखांचे साहित्य जप्त

सांतिनेझ येथील सिल्विया हाईट्स या इमारतीच्या सातव्या मजल्यावरील जागेत हे बनावट कॉल सेंटर सुरू केले होते. दोन महिन्यांपासून हे सेंटर सुरू होते. याची माहिती पणजी पोलिसांना मिळाल्यावर गुरुवारी मध्यरात्री या सेंटरमध्ये कर्मचारी कामात गुंतले असतानाच छापा टाकण्यात आला.

यावेळी विविध कंपन्यांचे २५ लॅपटॉप, चार्जर्स, १५ हेडफोन्स, ११ माऊस, ४ राऊटर्स, १ लोड बॅलन्सर, २ ब्रॉडबँड स्विच, ४ ब्रॉडबँड केबल्स, ५ ॲडोप्टर्स, २५ मोबाईल्स, ३,५६५ रुपयांची रोख रक्कम मिळून सुमारे २६ लाख ४३ हजार ९०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT